नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा जि. नंदुरबार येथे दि.19 मार्च रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय शहादा आणि आयक्यूएसी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020: थीम अँड प्रोस्पेक्ट्स या विषयावर दि .19 मार्च 2024 रोजी सकाळी महात्मा गांधी सभागृह येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेसाठी प्राध्यापक डॉ. आर. एस. पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. एम. के. पटेल आणि आयोजन समितीच्या वतीने शहादा, तळोदा आणि धडगाव तालुक्यातील जास्तीत जास्त प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments