Header Ads Widget


जागतिक वन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे अनावरण...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे 


          शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्त भूगोल विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या भितीपत्रकांचे मा. प्राचार्य डॉ. अशोकभाई पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेतून आंतरराष्ट्रीय वन दिनासोबत त्याची मध्यवर्ती संकल्पना आणि महत्त्व सांगितले तसेच समाजात जंगल व पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाबद्दल चर्चा केली आयुर्वेद, जैवविविधता यांचे ज्ञान मिळावे म्हणून जगभरात दरवर्षी 21 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. किरण सुतार, विशाल चित्ते, मोगरा पावरा, राजेंद्र पाडवी या विद्यार्थ्यांनी सुंदर भित्तीपत्रके तयार करण्यात आपले योगदान दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोकभाई पाटील म्हणाले की जंगले एक प्रकारे माणसाच्या श्वास आहेत. वृक्ष जंगलांच्या तर जंगले मानव व वन्यजीवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच्यातून जंगले आणि मानवी जीवनाचा जवळचा संबंध दिसून येतो किंबहुना मानवी जीवन हे बऱ्याच अंशी जंगलांवर अवलंबून आहे म्हणून जंगलांचे संवर्धन शाश्वत विकासाच्या एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणासाठी जंगल निर्माण करून त्यास वाढीस लावण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

Post a Comment

0 Comments

|