नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे
शहादा, तालुक्यातील जावदे हवेली, ता. शहादा येथील शि.ब.पटेल माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब दीपक पाटील आणि शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकलचे वाटप करण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख एस.एस.पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवानभाई पाटील, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुभाष वाघ, दामळदा उपसरपंच डॉ. विजय चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब दीपक पाटील आणि विस्तार अधिकारी श्री. तावडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन आर.एम. पाटील यांनी केले. आर.एस. चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments