Header Ads Widget


कौतुक सोहळा ग्रामपंचायत आणि नवजीवन शेतकरी गट मानमोड्या यांच्यातर्फे आयोजित ...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधि / प्रा.गणेश सोनवणे 


     पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातून तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार शहादा येथील माझी वसुंधरा महिला शेतकरी गटाने प्राप्त केला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडी, पुणे येथे 29 फेब्रुवारी रोजी झाला. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि विलास शिंदे यांच्या हस्ते माझी वसुंधरा महिला शेतकरी गटाला सन्मान चिन्ह आणि 100000/- रुपयांचा धनादेश देण्यात आला. या गटाचा कौतुक सोहळा ग्रामपंचायत आणि नवजीवन शेतकरी गट मानमोड्या यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. 


        गटशेतीवर आधारित या अनोख्या स्पर्धेमध्ये महिला शेतकरी यांनी एकत्र येऊन कापूस पिकाचा गट बनविला. आणि पिकांचे तंत्रशुद्ध पद्धतीने नियोजन करून, पीक व्यवस्थापन व नैसर्गिक कीड व्यवस्थापन, शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल शेती शाळांच्या माध्यमातून प्रयत्न केले. यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत करून उत्पादनात वाढ केली गेली. या कौतुक सोहळ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील , पाणी फाऊंडेशन चे गुणवंत पाटील, गोपाल पाटील, कृषी अधिकारी काशिनाथ वसावे, प .स . सदस्य गोपी पावरा, सरपंच देवा पावरा सह मान्यवर उपस्थित होते. गुणवंत पाटील यांनी गत शेती काळाची गरज का आहे, कश्या पद्धतीने केली पाहिजे , काँटरक्ट फार्मिंग, इ विषयी मार्गदर्शन केले. काशिनाथ वसावे यांनी शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहे या बाबत माहिती दिली. गोपाल पाटील यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा योग्य वापर करून उत्पादन वाढ आणि पाण्याची बचत या विषयी मार्गदर्शन केले. अभिजित पाटील यांनी विजेत्या गटाचे कौतुक केले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या सोयी सुविधां बाबत माहिती सांगितली. सदर कार्यक्रमासाठी राजेश पावरा, हंसराज पावरा, मंगल पावरा, चंद्रसिंग पावरा, नवजीवन शेतकरी गट, भूमिपुत्र शेतकरी गट, जीवन शेतकरी गट, याहा मोगी शेतकरी गट, ग्राम पंचायत इ. चे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

|