Header Ads Widget


काळ्या बाजारात धान्य नेणाऱ्या वाहनासह साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त...

नंदुरबार/ प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील कोठार रस्त्यावर धडगावकडून गहू तांदूळ भरुन येणारा आयशर ट्रक येत असतांना तपासणी करण्यात आली असता पकडण्यात आला. ट्रक चालकाकडे संबंधित मालाची विचारपूस केली असता त्याकडे कुठलेही धान्य बिल आढळून न आल्याने काळया बाजाराची वाहतूक करत असल्याच्या संशयावरुन वाहनासह धान्य असा सुमारे नऊ लाख ६१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर (ट्रक क्र.एम.एच.१५ डीके १४९७) यात ७३ हजार ७००रुपये किंमतीचा ६७ कट्टे ३३.५० किलो वजन असलेला गहु व ८७ हजार ७५० रुपये किंमतीचा ६५ कट्टे ३२.५० किलो वजन असलेला तांदुळ व ८ लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा एकुण ९ लाख ६१ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळोदा पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात चालक भिका गुलाबसिंग ठाकरे (रा. निगदी ता. धडगाव) तसेच चालकाचा मदतनीस आकाश दिलीप ढोले (रा. वडफळ्या ता. धडगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल काळया बाजारात विक्री करण्यास जात असतांना कोठार गावाच्या रस्त्याच्या उतारावर धडगाव-तळोदा रस्त्यावर मिळुन आला. सदर गहु, तांदुळ कोणत्या ठिकाणी काळ्या बाजारात जाणार होता? काळ्या बाजाराचा म्होरक्या कोण? असे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप करीत असून धान्याच्या काळ्या बाजारातील म्होरक्यापर्यंत पोलिस पोहचतात का? याकडे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments

|