Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्याच्या अतीदुर्गम भागात असलेल्या, धडगाव तालुक्यातील तिनसमाळ रस्त्याची गुणवत्ता निरीक्षकांद्वारे तपासणी करण्यात आली..

नंदूरबार/प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तिनसमाळ येथील रस्ता संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत या रस्त्याची तक्रार वरिष्ठ स्तरावर केल्यानंतर राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याद्वारे रस्त्याची तपासणी करण्यात आली आहे, रस्त्याच्या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना, संपूर्ण निधी त्या कामावर खर्च न झाल्याची गंभीर बाब समोर आली असल्याचे चित्र आहे, त्यामुळे आता याप्रकरानातील दोषींवर काय कारवाई होणार याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तिनसमाळ हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेले महाराष्टाचे शेवटचे गाव आहे, येथील ग्रामस्थांचे दळणवळण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून, तिनसमाळ येथे रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून आचपा फाट्यापासून ते नर्मदा काठापर्यंत रस्ता केला जाणार होता, परंतु कंत्राटदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तीन किलोमीटर रस्ता मागून करून रोषमाळच्या धनखेडी फाट्यापासून ते तिनसमाळपर्यंत वरचावर निकृष्टपणे पूर्ण केला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वेळावेळी तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीची कोणतीच दखल घेतली जात नव्हती. अखेर परिसरातील ग्रामस्थांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान ग्राम सडक योजने विभागात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत या रस्त्याची फेर तपासणी करत अहवाल सादर करण्याचे आदेश काढण्यात आले, त्यानुसार गुणवत्ता निरीक्षक यांनी तिनसमाळ येथे प्रत्यक्ष भेट देत रस्त्याची तपासणी केली. गुणवत्ता निरीक्षकाद्वारे रस्त्याची तपासणी होणार असल्याचे कळताच, संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांनी सदरचा रस्ता सर्व निकष पाळत पूर्ण केल्याचा दावा केला,

निरीक्षक दी. वी. फडनेर व बी.एम. उगाळे पहिल्याच दिवशी 8 किलोमीटर पायी चालून ग्रेड मध्ये बसतो की नाही ? याची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पाच किलोमीटर पायपीट करून गुणवत्ता तपासणी केली. मात्र मंजूर निधी पूर्ण खर्च न झाल्याचे निरीक्षकांच्या तपासणीत समोर आले. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाची चांगलीच कोंडी झाली. सदर रस्त्याची चौकशीकरून संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करून रस्ता तत्काळ नवीन काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली, यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्यासह गौतम पगारे, प्रमोद झाल्टे, दिलीप शिंदे, अभियंता सायसिंग पावरा, जोहार फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पावरा, ग्रामस्थ तानाजी पावरा, जोरदार पावरा, गुलाबसींग पावरा, गणपत पावरा आदी उपस्थित होते.

या सर्व गडबडीत तिनसमाळकडे जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील आहे. राज्य गुणवत्ता निरीक्षक तपासणी करण्यासाठी येणार असल्याचे कळताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदाराने एका रात्रीत नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर विसरवाडी येथील रस्त्याचे दिशादर्शक फलक काढून तिनसमाळ रस्त्यावर लावले. मात्र त्यांनी हे पाहिले नाही की, बोर्डवर काय लिहिले आहे, रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा आणि फलक लावला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा. तोही दुसऱ्या गावाचा कामाचा फलक

"संपूर्ण रस्त्याची तपासणी करून राज्य शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा विभागाला अहवाल सादर केला जाईल. त्रुटी निघाल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल.असे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे गुणवत्ता निरीक्षक दि.वी. फडनेर यांनी सांगितले आहे, "रस्ता हा आमचा जीवनमानाचा प्रश्न आहे. आणि तो जीवनमरणाचा करून ठेवला आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या संपतील पण धरती आहे. तोपर्यंत रस्ता असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे." असे स्थानिक ग्रामस्थ- लक्ष्मण मोगरा पावरा यांनी सांगितले आहे,

"रस्ता जोपर्यंत गुणवत्तापूर्ण तयार होत नाही. तोपर्यंत निवेदन आणि पाठपुरावा करतच राहणार."असे असे तीनसमाळ येथील ग्रामस्थ तानाजी पावर यांनी तक्रार केली आहे.

Post a Comment

0 Comments

|