Header Ads Widget


अतिक्रमण हटाव मोहीम ठरली फुसका बार ,तळोदा नगरपालिका; केवळ रस्त्यावरील तात्पुरते अतिक्रमण काढले, पक्के अतिक्रमण 'जैसे थे'

नंदुरबार/प्रतिनिधी : तळोदा येथील स्त्यावर हातगाड्या न लावण्याच्या सूचना भाजी मंडई व स्मारक चौक परिसरातील हातगाडी धारकांना हातगाड्या रस्त्यावर न लावण्याच्या सूचना देत अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या सोपस्कार पार पाडण्यात आला. रस्त्यालगत असणाऱ्या बांधकाम सुरू असणाऱ्यांना रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे मोठा गाजावाजा करून अतिक्रमण हटाव मोहिमेचा बागुलबुवा केवळ फुसका बार ठरलेला दिसून आला.

कानाडोळा केल्याने तो प्रश्न दिवसेंदिवस जटील बनला आहे. काही दिवसांपूर्वी तळोदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी आयएएस अधिकारी असणाऱ्या अंजली शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हटवण्याचा मुद्दा अतिक्रमण प्राधान्याने हाती घेतला होता. ६२ किरकोळ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना त्यांनी दिली होती.तळोदा नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी अंजली शर्मा यांनी रस्त्यावर उतरत मंगळवारी शहरातील भाजी मंडई व स्मारक चौक परिसरातील अतिक्रमणधारकांना पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली. मात्र, रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना सूचना देऊन मुख्य बाजारपेठेतील पक्क्या अतिक्रमणाला अप्रत्यक्षरीत्या अभय देण्यात आल्याने पालिकेकडून राबवण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम फुसका बार ठरल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळाली.तळोदा शहरातील बाजारपेठेतील असणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला आहे. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, या अतिक्रमणांकडे वेळोवेळी नगरपरिषदेने विहित मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात येईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी मुख्याधिकारी अंजली शर्मा यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशात बांधकाम शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी, गॅस कटर इत्यादी आवश्यक साहित्यासह मोहिमेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिस बंदोबस्त उपलब्ध होऊ न शकल्याने अतिक्रमण हटावची मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.मंगळवारी शहरात पुढे ढकलण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आदेशात नमूद केल्यानुसार बाजारपेठेतील पक्क्या अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र, केवळ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या लॉरीधारकांना सूचना देऊन अतिक्रमण हटवण्याचे सांगण्यात आले. स्मारक चौकातील एक-दोन टपरी वगळता कोणत्याही तळोदा शहरात मेन रोडवरील बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमेप्रसंगी उपस्थित असणाऱ्या प्रभारी मुख्याधिकारी अंजली शर्मा, विक्रम जगदाळे, राजेंद्र माळी, अश्विन परदेशी व उपस्थित नागरिक.प्रकारचे पक्के अतिक्रमण हटवण्यात न आल्याने, नेमकी माशी शिंकली कुठे? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारीअंजली शर्मा, विक्रम जगदाळे, राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी, मोहन सूर्यवंशी आदींसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त यावेळी तैनात होता.

Post a Comment

0 Comments

|