Header Ads Widget


जिल्हा पोलीस दलाची धडक कारवाई, एक दिवसात अ- जामिनपात्र वॉरंटमधील 6 आरोपींना केली अटक..

नंदूरबार/प्रतिनिधी : नंदुरबार जिल्हयात वॉरंट बजावणीची मोहीम सुरु असतांना दिनांक 17 मार्च 2024 रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी अ-जामिनपात्र वॉरंट मधील 6 आरोपींना अटक केली आहे. त्यामधील न्यायालय, नंदुरबार यांनी यापुर्वी समन्स काढले होते, त्या समन्सची बजावणी पोलीसांनी केली होती. तरी समन्स बजावुनही आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वॉरंट काढुन त्याची देखील बजावणी करण्यात आली परंतु जामीनपात्र वॉरंटातही काही आरोपी गैरहजर राहील्याने न्यायालयाने आरोपी यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले त्याअन्वये एकुण 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार विभाग नंदुरबार संजय महाजन यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी.गुंजाळ व स्टाफ अशांनी केली.

"तरी सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, न्यायालयामध्ये आपल्या चालु असलेल्या केसेस बाबत आपण समन्स/जामीनपात्र वॉरंटमध्ये न्यायालयात वेळोवेळी हजर राहुन वॉरंट रद्द करुन घ्यावे." जेणेकरून अशाप्रकारे मा न्यायालयात हजर न राहील्याने अजामिनपात्र वॉरंटची कारवाईटा ळता येईल. तसेच यापुढेदेखील अशा प्रकारची कारवाई जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु राहील याबाबत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

|