Header Ads Widget


शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूनाचा मुख्यसुत्रधार व चार आरोपींना अटक करत "गेम ओव्हर" केला ..

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे  

कौटुंबिक वादातून शहादा राज्य परिवहन महामंडळातील वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३)

याचा खून त्यांच्याच जावई गोविंद सुरेश सोनार यांनी घडवून आणल्याच्या तपासात उघडकीस आले आहे. सासऱ्याचा खून करण्यासाठी जावयाने मारेकऱ्यांना तीन लाखाची सुपारी दिली होती . मयत राजेंद्र मराठे यांच्या खूणातील जावई सह पाच मारेकऱ्यांना शहादा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कांदिवली येथून अटक केलेली आहे. या खुनाच्या घटनेत दोन अल्पवयीन मुलांच्या समावेश आहे. सूत्रधार व चारही मारेकरी अशी एकूण पाच मारेकऱ्यांना आज शहादा न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूनाचा मुख्यसुत्रधार व चार आरोपींना अटक करत "गेम ओव्हर" केला आहे . 

मिळाली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा बसस्थानक येथे वाहक पदावर काम करीत असलेले, शहादा - दोंडाईचा रस्त्यालगत हिरो शोरूम मागच्या बाजूला सदाशिव नगर भागातील राजेंद्र उत्तमराव मराठे व त्यांच्या मुलगा प्रद्दुम्म दिं. १४ मार्च रोजी बाजारात गेले होते. बाजार झाल्या नंतर वडीलांचे आजुबाजुला तपास केला असता अढळून आले नाही. यानंतर दुसर्‍या दिवशी प्रद्दुम्म यांने शहादा पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यात आली. शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटणेची विस्तृत माहिती मिळताच बाजार भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व फुटेज काढले होते.पोलीसांचा तपास सुरु असताना दिं १६ रोजी रात्रीचा वेळी तालुक्यातील नांदर्डे - तऱ्हावद रस्त्यावर फरशी खाली अज्ञात व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती मिळाली . पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व कर्मचारी यांनी लागलीच घटणास्थळी पोहचले होते. प्रेताच्या ठिकाणी सदर व्यक्तीस गळा दाबून व लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आलेली होती. व त्याची हत्या करण्यात आलेली होती. प्रेतवर केमिकल टाकून जाळण्यात आले होते हे सगळं बघितल्यानंतर पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना घटणेची माहिती दिली होती. घटणा स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे येऊन पोहचले होते. मयत मराठे यांचे पत्नी मीनाक्षी मराठे व मुलगा प्रद्दुम यास घटनेची माहिती देऊन घटनास्थळी बोलवण्यात आले त्यावेळी सदरचा प्रेत हे राजेंद्र मराठे यांचे आहे असे निष्पन्न झाल्यानंतर शहादा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व कर्मचारी तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्या सहकार्याने तपास सुरू झाला होता. दरम्यान गळा आवळून नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केला आहे. प्रेतवर केमिकल टाकून देण्यात आले त्याच्या व्हिडिओ बनवून आरोपी जावई गोविंदला पाठवून" गेम ओव्हर" असा मेसेज पाठविला होता. घटने नंतर चारही मारेकरी सुरतला पळून गेले होते सुरत होऊन ते गोराई येथे आले होते आरोपीत निलेश बच्चू पाटील, विक्की किशोर बिरारे हे दोन व सोळा-सतरा वर्षांच्या दोन असे हे चारही आरोपी व मुख्य सूत्रधार गोविंद सोनार याना पोलिसांनी अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले असता चौकशीत त्यांनी राजेंद्र मराठे यांची सुपारी घेत हत्या केल्याच्या कबुली दिलेली आहे. 

सोमवारी दुपारच्या वेळेस खून करणारा मुख्य सूत्रधार गोविंद हा गोराईतील माँलमध्ये केस कापण्यासाठी आले होते. तेथून पुन्हा पळून जाणार होते मात्र त्याचे लोकेशन सापडल्याने त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले सासऱ्याच्या आरोपी गोविंद हा जावई असून त्याच्यात कुटुंब वाद होता या दोघांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते त्याच्यामुळे वादाच्या कचत्यातून रस्ता मोकळ्या करण्यासाठी सासरा राजेंद्रच्या हत्येचा कट त्याच्याच मित्रांना हत्तेची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. 


Post a Comment

0 Comments

|