Header Ads Widget


राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची जिल्हास्तरीय बैठक दोंडाईचा येथे संपन्न...

 

 







दोंडाईचा/प्रतिनिधी 


दोंडाईचा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य कार्यालयात धुळे जिल्हा राष्ट्रवादीचे कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग (ग्रामीण) बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांनी केले, मोठ्या संख्येने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका, शिंदखेडा तालुका, साक्री तालुक्यातील व पिंपलनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,येणाऱ्या लोकसभा निवडणूक व पक्ष संघटक वाढविण्या बाबत बैठकीत संघटनात्मक बाबीवर चर्चासत्र पार पडले, प्रस्तावनार बोलतानां नाजीम शेख यांनी सांगितले कि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उप मुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब यांचा नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम राज्य भरात सुरू आहे,तेच काम आम्ही धुळे जिल्हात प्रभावी पणे करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वरीष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व नविन पदाधिकारी व कार्यकर्ते साथ राहिल अशी आशा बाळगतो.

 बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी विधी व न्याय मंत्री डाॅ नाना साहेब हेमंतराव देशमुख साहेब यांनी मार्गदर्शन केले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित दादा पवार हे विकास पुरुष नेते आहेत,,ना. अजित दादा पवार यांच्या पर्यंत्नाने शिंदखेडा तालुक्यात तापी बुराई योजनांचे काम लवकरात लवकर मार्गी लागेल, शिंदखेडा तालुक्यातील हजारो एकराला बारमाही पाणी मिळेल,शिंदखेडा तालुका सुजलाम सुफलाम होईल,यात काढी मात्र शंका नाही, ना. अजित दादानीं मुंबई येथे अल्पसंख्यांक मेळाव्यात सांगितले कि आम्ही सेक्युलर आहोत, शाहू- फुले - बाबा साहेब आंबेडकरांचा* विचारधारेवर चालणारा आमचा पक्ष आहे, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा विकासासाठी दादा प्रयत्नशिल आहेत ते नक्की विकास करतील मला विश्वास आहे असे सांगितले.

बैठकीत माजी जि.प.उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर भामरे, माजी नगराध्यक्ष रविंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पुजा ताई खडसे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिपकराव जगताप, आर पी आय चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव वाजीद शेख, ओ.बी.सी सेल चे जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला विधानसभा अध्यक्ष अनिता ताई देशमुख,कय्युम पठाण, अॅड प्रमोद मराठे, असलम मन्यार, युवक चे शहराध्यक्ष भरत जाधव, बापुजी मिस्तरी, बिलाल बागवान,मनोज महाजन, छोटु शाह, युवक धुळे जिल्हा सरचिटणीस मोहसिन शेख,नासीर शेख,शाहरूख शेख, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.अनेक धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पार्टी चे अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना पदभार देऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यात धुळे जिल्हा उपाध्यक्ष शिरपूर चे बाबा कलंदर खाटीक, धुळे जिल्हा सरचिटणीस बेटावद चे रईस इब्राहिम मन्यार, शिरपूर तालुका अध्यक्ष पदी जहुर कालु खाटीक, शिरपूर तालुका कार्याध्यक्ष मुस्तकीम मो.शफी मन्यार, शिरपूर शहराध्यक्ष पदी जाकीर रज्जाक शेख, शिरपूर शहर कार्याध्यक्ष वाजिद आसिफ मिर्झा, साक्री तालुका अध्यक्ष पदी शब्बीर हाजी दादामिया, पिंपलनेर शहराध्यक्ष पदी उमेर खान याकुब खान पठाण, पिंपलनेर शहर कार्याध्यक्ष शब्बीर सलीम पटेल, साक्री तालुका उपाध्यक्ष पदी अशरफ जमाल पठाण, पिंपलनेर शहर उपाध्यक्ष मुशाहिद शेख मुश्ताक, शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष पदी अश्पाक खा समशेर खा मन्यार, शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष फिरोज शेख ताहेर, शिंदखेडा तालुका संघटक सचिव शरीफ मैताब शेख, दोंडाईचा शहराध्यक्ष पदी रईस सलीम शेख, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष मिर्झा रियाज बेग गुलाब बेग, दोंडाईचा शहर उपाध्यक्ष अयाज बेग शब्बीर बेग,दोंडाईचा शहर सचिव पदी अल्ताफ फिरोज पठाण, दोंडाईचा शहर सचिव मुजाहिद शाह जमिल शाह, यांच्या सह अनेक पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|