Header Ads Widget


शेतकऱ्यांचा हितासाठी व शेतमजुरांच्या न्यायासाठी यापुढे ही हा लढा निरंतर सुरु राहणार ; अभिजीत पाटील( शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती )

 



शहादा/ प्रतिनिधी 


शहादा सूतगिरणी सुरू होऊन परिसराला गत वैभव प्राप्त झाले पाहिजे, यासाठी निवडणूक लढविली होती. लोकशाहीत सभासदांनी दिलेला कौल मान्य करायचा असतो. सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करुन सूतगिरणी भाडेतत्वावर न देता स्वतः चालून दाखवावी. सूतगिरणीत व सातपुडा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे दया.असे सांगत शेतकऱ्यांचा हितासाठी व शेतमजुरांच्या न्यायासाठी यापुढे ही हा लढा निरंतर सुरु राहणार असे प्रतिपादन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी केले.नांदरखेडा (ता. शहादा) येथील वनश्री फार्मर प्रोडूसर कंपनीच्या जिनिंगच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या उंटावद -होळ येथील जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीच्या निवडणुकीत परिसरात वैभव प्राप्तीसाठीच्या लढ्यात सभासदांनी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढविणारा असल्याने सभासद, कार्यकर्ते व हितचिंतकांची आभार सभा शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. सुरेश नाईक,माजी जि. प. सदस्य हेमराज पाटील,अनिल पाटील, हिरालाल पाटील, हरी पाटील ,बुद्धर पाटील, लक्ष्मण पाटील, भिका आप्पा पाटील, दगडू पाटील, रमेश पाटील ,मणिलाल पाटील, विठ्ठल पाटील, डॉक्टर वसंत पाटील, दत्तू पाटील ,शिवाजी पाटील ,एस. आर. बागल,दिलीप गांगुर्डे आदींसह मान्यवर व्यासपीठावर होते.यावेळी

आभार सभेत अभिजीत पाटील पुढे म्हणाले की, तळोदा शिंदखेडा, नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावातील सभासदांनी शेतकरी विकास पॅनलला भरभरून मतदान केले. आज सुतगिरणीवर बँक तसेच इतरही खाजगी देणे मोठ्या प्रमाणावर आहे.त्यात शेतकऱ्यांचे कापसाचे थकीत पेमेंट व्याजासकट देणे गरजेचे आहे.त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचेही देणे देण्याची सत्ताधाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. या निवडणुकीत अनेकांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत त्यांनाही आत्मपरीक्षणाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा दिल्यास निश्चितच शेतकरी डोक्यावर घेऊन नाचतील. सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या आभार सभेत मंत्री, आमदार उपस्थित होते त्यांनी सूतगिरणी ला गत वैभव प्राप्त करून देऊ असे सांगितले परंतु हा शब्द पूर्णपणे पाळला गेला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे कधी परत करणार याविषयी बोलणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांचे कापसाचे पेमेंट थकीत आहे त्यांचे दुःख कोणीही ओळखू शकत नाही ऊसाच्या पैशांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत हे आमदार, खासदार व चळवळीच्या नेत्यांना दिसत नाही का? असा घणाघात करीत निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून झालेल्या आरोपांच्या त्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. लोकनायक जयप्रकाश नारायण सुतगिरणी बंद पडली म्हणून परिसरात २०१९ ते २०२४ या पाच वर्षात चार जिनिंगा सुरु झाल्या ही शोकांतिका आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसून पत्रकाच्या माध्यमाने निवडणुकीपूर्वी लोकांची मते जाणून घेतली यावेळी सभासद व शेतकऱ्यांनी आमचे कापसाचे पैसे सूतगिरणीत अडकले आहेत, तुम्ही निवडणूक लढवा असे सांगितले म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. वर्षभरात वनश्रीचा अजून नवीन प्रकल्प सुरु होणार. बाजार समितीत निवडून आल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेतला दीड लाख क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली.याप्रसंगी उपस्थितांमध्ये महेंद्र पाटील (तळवे), संदीप पाटील (कलमाडी), शिवाजी पाटील (शेल्टी), हिरालाल पाटील (पुसनद), एस. आर. बागल (निमगुळ), रमेश पाटील (पाडळदा), दिलीप गांगुर्डे, डॉ. वसंत पाटील (नंदुरबार), डॉ. सुरेश नाईक (चिखली), हरी पाटील (प्रकाशा), हेमराज पाटील (शिंदखेडा) यांनी आपल्या मनोगतात निवडणुकीत पराभव झाला असला तरी आमच्यासाठी लढा निरंतर सुरू ठेवावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांनी केले.शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, दुतोंडी लोकांपासून सावध राहिले पाहिजे, कार्यकर्ता हा महत्त्वाचा दुवा असतो, शेतकऱ्यांचा विकास कसा होईल हेच आमचे ध्येय आहे, बंद पडलेली सुतगिरणी चालू व्हावी व शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी निवडणूक लढवली होती. शेतकऱ्यांचा न्याय हक्कसाठी संघर्ष केला होता. सूतगिरणी मध्ये ज्यांचे पैसे राहिले आहेत त्यांना परत मिळणे ही अपेक्षित आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|