Header Ads Widget


अश्लील फोटो टाकणाऱ्या शिक्षकाच्या संदर्भात सायबर क्राईमला तक्रार दाखल; निवेदनाद्वारे आदिवासी संघटनांनी गून्हा दाखल करीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली...

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


 धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील एका शिक्षकाने महाविद्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर चक्क मुलींचे नको ते फोटो व्हायरल करून आदिवासी मुलींची बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.या प्रकाराला महिना उलटूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या नेतृत्वाखाली आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी धुळे येथे सायबर क्राईम पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात साक्री तालुक्यातील आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत.त्यांची निवास व भोजन व्यवस्था शासकीय आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली आहे.9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमाराला ‘इयत्ता अकरावी सायन्स ग्रुप’‘ साक्री तालुका आमदार ग्रुप’,‘बल्हाने ग्रुप’ या वेगवेगळ्या ग्रुपवर मुलींचे अश्लील फोटो व्हायरल झाले.धक्कादायक म्हणजे फोटो व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा एक शिक्षक होता.त्याने त्याच्या व्हाट्सॲप क्रमांकावरून अत्यंत बीभत्स,घाणेरडे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून आदिवासी मुलींची प्रतिमा कलंकित केली.केवळ आदिवासी समाजातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे.या महाशयांचे हे कृत्य नेहमीचे आहे.यापूर्वीही असे प्रकार त्यांनी केले आहेत.विकृत मनोवृत्तीचे हे शिक्षक समाजासाठी कलंक आहेत.दहिवेल येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहाच्या गृहपाल यांनी ही केवळ बघ्याची भूमिका घेतली.वसतिगृहाच्या गृहपाल म्हणून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची होती त्यामुळे हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी तसे न करता याबाबत 10 फेब्रुवारी रोजी केवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून जबाबदारी झटकली.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

"शिक्षक म्हणतो माझा मोबाईल हॅक झाला होता " हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शिक्षकाने त्याचा मोबाईल हॅक झाल्याबाबत सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. त्या तक्रारीचाही अद्याप कोणताही तपास झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की,आम्ही व्हाॅट्सॲप कंपनीकडून माहिती मागविली आहे. माहिती मिळाल्यानंतर सत्यता समोर येणार आहे.या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास करुन संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावरती गणेश गावित, संदिप भोये, संदिप सूर्यवंशी, प्रेमचंद सोनवणे , संतोष चौधरी ,पुष्पाताई चौधरी आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|