नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे
शहादा येथील न्यायालयात वकिली करणारे विधिज्ञ अलताफ हासमानी यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर सैय्यद संकुला तर्फे प्राचार्य सैय्यद इफ्तेखार अली सर यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड.अब्दुल रहमान हासमानी, शेख शाफियोद्दिन, सैय्यद जावेद अली, सैय्यद शोएब सर आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य सैय्यद इफ्तेखार अली यांनी सांगितले की, ज्ञान आणि समर्पण च्या जोरावर ॲड.अलताफ हासमानी यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून तुम्ही या प्रतिष्ठित भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी कराल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर सैय्यद उर्दू संस्थेचे अध्यक्ष प्रा.सैय्यद लियाकत अली तसेच सर्व संचालक मंडळ, कर्माचारी यांच्या कडून सत्कार करण्यात आला. ॲड.अलताफ हासमानी यांचा विविध विभागाच्या केसेस हाताळण्या चांगला हातखंडा असल्याने या अनुभव व कर्तृत्ववाच्या जोरावर त्यांची भारत सरकारच्या शासकीय नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments