Header Ads Widget


वीज वितरण कंपनीच्या लोंबकळनाऱ्या तारा, जीर्णपोल,त्वरीत दुरुस्त करण्यात यावेत; श्री. जितेंद्र जमदाडे(भा.ज.पा. शहादा शहराध्यक्ष)

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे 

शहादा शहरातील जुन्या व नव्या वसाहतींमध्ये जीर्ण अवस्थेत असलेले पोल आणि लोंबकळनाऱ्या तारा त्वरीत दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

याबाबत शहरातील नवीन व जुन्या वसाहतींमध्ये मधील नागरिकांनी सातत्याने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडे विनंती करून मागणी केली होती की आमच्या परिसरामध्ये जीर्णपोल व लोंबकळणारे तारे व निकामी विद्युत पोल हे तात्काळ आपण वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून काढून द्यावे अशी विनंती केली होती त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शहादा शहराच्या वतीने वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, शहादा शहरातील जुन्या वसाहतीमध्ये जीर्ण अवस्थेत असलेले पोल आणि लोंबकळणाऱ्या तारा या तात्काळ आपण त्या ठिकाणी दुरुस्त कराव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आपल्या मागणीची लवकरात लवकर दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासित केले. यावेळी शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजपचे पदाधिकारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे व पदाधिकाऱ्यांना वयोवृद्ध महिला भेटली त्या महिलेने आपल्या अतिरिक्त लाईट बीला बद्दल तक्रार केली. त्याचक्षणी शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित अर्बन विभागाचे अभियंता श्री पाडवी यांना वाढीव बिलाबद्दल कल्पना दिली श्री पाडवी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना त्या वयोवृद्ध आजीचे अतिरिक्त लाईटबिल तपासुन कमी करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी त्या वयोवृद्ध महिलेने पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

"शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये जीर्णपोल, लोंबकळणाऱ्या तारा किंवा निकामी पोल असतील तर त्यांनी तात्काळ भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्या परिसरातील जीर्णपोल लोंबकळणाऱे तार व निकामी पोल बदलण्यात येतील."---जितेंद्र जमदाडे (शहराध्यक्ष, भाजप)

Post a Comment

0 Comments

|