Header Ads Widget


वातावरणात कमालीचा बदल झाल्याने नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम..

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे 

  शहादा शहरासह परिसरात दिनांक २१ मार्चपासून वातावरणात कमालीच्या बदल झाल्याने नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत असून वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.अचानक वातावरण बदलल्याने वयोवृद्ध नागरिकांना अधिक त्रास जाणवायला लागला आहे.

       गेल्या चार-पाच दिवसापासून विदर्भ सह अन्य जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने अजून लावली.काही भागात गारपीट देखील झाली.दिनांक २१ मार्च रोजी शहादा शहर सह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते.अधून-मधून तीव्र ऊन देखील जाणवत होते.त्याच्या परिणाम मानवी जीवनावर होतांना दिसून आला.दिनांक २२ मार्च रोजी देखील कडक ऊन व ढगाळ वातावरण होते.

      वातावरणातील बदलामुळे डोकेदुखी अंगदुखी अचानक ताप वाढणे चक्कर येणे सारखे प्रकार वाढले आहेत.लहान मुलांना देखील त्रास जाणवायला लागलेला आहे.रात्रीच्या वेळी पहाटेस गारवा निर्माण होतो.अचानक वातावरणातील बदलावाच्या परिणाम शेती पिकांवर देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.असेच ढगाळ वातावरण अधून मधून राहिल्यास ज्यांच्या हरभरा हे पीक काढणे बाकी आहे त्या पिकांवर अळीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.या व्यतिरिक्त पपई पिकावर देखील परिणाम होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments

|