नंदूरबार/प्रतिनिधि: 20 मार्च 2024 रोजी सायंकाळच्या दरम्यान नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ लेआऊटचे काम सुरु असलेल्या ठिकाणी, अज्ञात आरोपींनी धिरज ऊर्फ महेंद्र दिलीप भोई वय 26 रा. संजय नगर, गवळीवाडा, नंदुरबार यास गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले, म्हणुन कृष्णा दिलीप भोई वय 30 वर्षे रा. संजय नगर, गवळीवाडा, नंदुरबार यांचे फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतां विरुध्द् गु.र.नं. 232 / 2024 भा. दं.वि. कलम 302 प्रमाणे 21 मार्च 2024 रोजी दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 21 मार्च 2023 रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा नंदुरबार शहरातील नवनाथ नगर परिसरात राहणारा गौरव सोनवणे (चौधरी) याने व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो सद्या खांडबारा परिसरात पळून गेलेला आहे. मिळालेल्या बातमीवरुन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत इसम गौरव सोनवणे (चौधरी) याचा खांडबारा येथे शोध घेतला असता तो परिसरात मिळून आला. त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असले बाबत सविस्तर माहिती दिली. व त्याचे इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता ते बाहेर राज्यात पळून गेले असल्याचे सांगितले. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यात रवाना झाले व सदर गौरव सोनवणे याने दिलेल्या माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीव्दारे दोन्ही संशयीत इसमांचा सुरत येथे जावून शोध घेतला असता ते सुरत येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता यज्ञेश ऊर्फ यश हरीष चौधरी वय18, जयवंत ऊर्फ जयेश गणेश पाटील वय 20 दोन्ही रा. नवनाथ नगर, नंदुरबार असे सांगितले. सदर आरोपींना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले. तसेच सदर गुन्हयातील त्यांचा एक साथीदार गौरव रोहिदास खेडकर (भोई) वय 20 रा.जूनी भोई गल्ली, नंदुरबार यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना अधिक विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा पुर्व वैमनस्यातून कट रचून मयतास ठार केले बाबत सांगितले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधीकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोह/राकेश वसावे, पोना/राकेश मोरे, पोना/विशाल नागरे, पोना/मोहन ढमढेरे, पोशि/विजय ढिवरे, पोशि/अभय राजपुत, पोशि/आनंदा मराठे, पोशि/यशोदिप ओगले तसेच शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोह/सुनिल येलवे, पोना/भट्ट धनगर, पोशि/किरण मोरे यांनी केली आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments