Header Ads Widget


शहादा जायन्टसतर्फे महिला दिना निमित्त आयतं पोयतं सख्यानं संपन्न...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 


शहादा येथील जायन्टस सहेली, जायन्टस हिरकणी, व जायन्टस दामिनी सहेली तर्फे महिला दिना निमित्त प्रविण माळी यांचा खान्देशचा सुप्रसिध्द एकपात्री हास्य प्रयोग संपन्न झाला. कुलकर्णी हाॅल मध्ये झालेल्या ४०५ व्या प्रयोगाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. खान्देशची अहिराणी बोली, रुढी परंपरा त्यांची गरज,त्यातले माधुर्य,व त्याचे मानसशास्रीय महत्वं याचे सुंदर व तेव्हढेच मनोरंजनात्मक विवेचन या प्रयोगाद्वारे करण्यात प्रविण माळी यशस्वी झाले. शेवट पर्यंत महिलांचा उत्साह बघण्या सारखा होता. 

बोली भाषेची गरज व अभिमान हे अभिव्यक्तिद्वारे उत्तम सादर केले तसेच मातांनी संस्कृती जतन करण्यासोबत खाद्य संस्कृतीचेही जतन करावे असे अध्यक्षीय मनोगत अनिंसच्या तालुका उपाध्यक्षा डाॅ मालविका कुलकर्णी यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणुन सोनामाई शि.प्र.मं. च्या सचिव वर्षा जाधव यांची उपस्थिती लाभली.या प्रसंगी सिमा सोनार (सोनार समाज अध्यक्ष)नयना सोनार,अध्यक्षा, उमंग नारी जयश्री अग्रवाल समाज अध्यक्षा,संगीत शिक्षिका डाॅ शितल जैन ,यांची ही विशेष उपस्थिती लाभली. कवी रमेश महाले, अनिंसचे संतोष महाजन,प्रदीप केदारे जायन्टसचे अध्यक्ष डाॅ विवेक पाटील,माजी अध्यक्ष डाॅ एच एम पाटील,कैलास भावसार,मानक चौधरी,भुषण बावीस्कर उपस्थित होते., सहेली माजी अध्यक्षा अरुणा पाटील,हिरकणी माजी अध्यक्षा मनिषा पाटील, अलका जोंधळे,प्रिती सोनार,योगीता पाटील,कल्पना सोनार ,वंदना गुरुबक्षानी,माधुरी चौधरी,रोहिणी अहिरे,संगिता जयस्वाल, प्रतिभा डोळे,कावेरी पाटील,सुकन्या पाटील,रेखा पाटील,ज्योती परदेशी,स्वाती कासोदेकर ,वर्षा पाटील, ललिता जगताप ,स्मिता मंगळे,शितल गवळे,कल्पना गिरासे माधूरी मांडगे, भारती गायकवाड यांनी संयोजन सहाय्य केले.जा.सहेली अध्यक्षा स्वाती पाटील,हिरकणी अध्यक्षा विजया मोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जायन्टस फेडरेशनच्या माजी अध्यक्षा ॲड संगिता एच पाटील यांनी केले. आभार दामिनी सहेली अध्यक्षा अर्चना निकुंभे यांनी मानले तर सुत्रसंचालन निलीमा चौधरी यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|