Header Ads Widget


महाशिवरात्रीच्या निमिताने गोरक्षनाथ मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 


शहादा तालुक्यातील वाघर्डे येथे महाशिवरात्रीच्या निमिताने गोरक्षनाथ मंदिराच्या परिसरात प.पु.भारत माहराज यांच्या हस्ते व साधक प्रा.सखाराम मोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील नागरिक व यात्रेकरू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        वाघर्डे येथे महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरते. या यात्रेत विविध संसारोपयोगी वस्तू विक्रीसाठी व्यापारी येतात. तसेच करमणूकीचे साधने येतात. ही यात्रा म्हणजे बालगोपालासाठी एक पर्वणीच असते. या यात्रेला शहादा तालुक्यातील व परिसरातील नागरिक, शिवभक्त भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभतो. योगाचार्य गुरू गोरक्षनाथ मंदिर परिसरात गांवकरी व भाविकांमार्फत फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प.पु.भारत माहराज, मार्गदर्शक प्रा.सखाराम मोते, सरपंच सौ.शारदाताई सखाराम मोते, उपसरपंच श्रीमती सुभद्रा दगा पवार, ग्रामसेवक एन.व्ही. गवळे, श्रीमती लाडकीबाई आस्तर मोते, श्रीमती निर्मला ईश्वर मोते, सामाजिक कार्यकर्ते जंगू हुन्या पवार, जालिंदर खारसिंग चव्हाण, राजाराम शिलदार चव्हाण, श्रीमती सानुबाई दिवाण मोते व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|