Header Ads Widget


सोनामाई महिला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे 


 शहादा येथील सोनामाई महिला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव होते.

         यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ॲड.स्मिता कुचेरिया सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट आयुक्त वर्षा जाधव महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.एस.पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोनामाई व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महाविद्यालयीन परीक्षा सह विविध स्पर्धा परीक्षा सामाजिक सांस्कृतिक उपक्रम क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व वाचनीय पुस्तके देऊन गौरव करण्यात आला.तसेच स्व.प्रेमचंद जाधव व भारत ज्योती आशाताई जाधव यांच्या नावाने दिली जाणारी शिष्यवृत्ती देखील वाटप करण्यात आली.कार्यक्रमातच महाविद्यालयाचे आशांकुर नियतकालीकाचे प्रकाशन करण्यात आले.

       यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना ॲड.स्मिता कुचेरिया यांनी विद्यार्थिनींनी मनाशी जिद्द व चिकाटी बाळगली पाहिजे.मुलींनी आत्मनिर्भर व्हावे.प्रत्येक क्षेत्रात सहभागी होऊन यश मिळवावे.जास्तीत जास्त मेहनत करण्याच्या प्रयत्न करा.चांगले संस्कार जीवनात आचरणात आणा असे सांगून शुभेच्छा दिल्या.तर प्राध्यापक संजय जाधव यांनी विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगून यश मिळवावे.यश आपल्या पाठीशी असते.यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा.शिक्षण मुलींच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असेच सांगितले.

          तर वर्षा जाधव यांनी बोलतांना विद्यार्थिनींनी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.महाविद्यालयीन विद्यार्थिनी परिवर्तनशील झाल्या पाहिजेत.चांगले संस्कार जीवनात भागल्यास यश आपोआप मिळते.चांगले ध्येय मनाशी बाळगावे असे सांगून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अहवाल वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.बी.आर.राजपूत यांनी केले.उपस्थितांचे आभार प्राध्यापिका एच.आर.कुलकर्णी यांनी मानलेत.कार्यक्रमाला विद्यार्थिनींचे पालक देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|