Header Ads Widget


जागतिक चिमणी दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात प्रा.डाॅ.मृणाल जोगी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद..

 





नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे



   पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय व जायंट्स ग्रुप, जायंट्स सहेली ग्रुप शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. 

   जागतिक चिमणी दिवस निमित्ताने के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात प्रा.डाॅ.मृणाल जोगी यांचे 'एक घास चिऊचा' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. दिवसेंदिवस होत चाललेला चिमण्यांचा ऱ्हास त्यासोबतच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाचे झालेले दुर्लक्ष, चिमणांच्या अधिवासावर झालेले अतिक्रमण या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले. त्यासोबतच पक्षी निरीक्षण कसे करावे आपल्या आणि चिमण्यांचे भावनिक नाते काय? लहानपणीच्या बडबडगीतामध्ये साजेसा असणारा चिमण्यांचा थाट आणि विविध कविता ऐकवून त्यांनी संवेदना जागृत केल्या. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. विवेक पाटील त्यासोबतच त्यांचे सहकारी असणाऱ्या सदस्यांनी महाविद्यालयाला चिमण्यांची घरटे भेट म्हणून दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गवांदे यांनी केले. जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष मानकभाई चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्वांप्रती आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल.पटेल, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद ,जायंट्स ग्रुपचे सर्व मानद सदस्य,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांची उपस्थिती लाभली.जागतीक चिमणी दिवस निमित्ताने कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|