Header Ads Widget


अरुण चौधरी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती


 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे



 शहादा येथील अरुण चौधरी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख तथा विधान परिषद आमदार आमच्या पाडवी यांनी शिवसेना (शिंदे गट) गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुख पद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर अरुण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली . सेना भवन मुंबई येथील मुख्य कार्यालयातून नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त जाहीर करण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्हाप्रमुख म्हणून अरुण चौधरी सहसंपर्कप्रमुख -- दीपक गवते (नंदुरबार व नवापूर विधानसभा) उपजिल्हाप्रमुख-- हसमुख पाटील(नंदुरबार नवापूर विधानसभा),आनंद सोनार -- (शहादा तळोदा विधानसभा )तर तालुका प्रमुखांमध्ये तळोदा -- प्रवीण वळवी, नंदुरबार-- रमेश पाटील शहादा-- राजेंद्र लोहार, नवापूर-- कल्पित नाईक,यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अरुण चौधरी यांनी या अगोदर नंदुरबार जिल्हा प्रमुख व सहसंपर्कप्रमुख म्हणून पदी भूषविलेली आहेत. त्यांच्या या सार्थ निवडीने शिवसैनिकांमध्ये आनंद साजरा केला जात आहे व त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

Post a Comment

0 Comments

|