Header Ads Widget


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीसांचा रूट मार्च...

 





साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांकडून आगामी लोकसभा निवडणूका व होळी, रमजान ईद अशा सर्व जाती धर्माचे सण उत्सव या अनुषंगाने पिंपळनेर पोलिसांकडून सकाळी ११:४० ते १२:४० वाजेच्या सुमारास रूट मार्च काढण्यात आला. पिंपळनेर शहर पोलीस स्टेशन पासून ,बस स्थानक, पंचमुखी कॉर्नर, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, जामा मस्जिद, खानका मस्जिद, नाना चौक, माळी गल्ली, रामनगर, नूरानी मस्जिद, इंदिरानगर ,बाबा चौक येथे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली बीएसएफ चे २ अधिकारी, ५० जवान, पोलीस स्टेशनचे २५ अमंलदार , आरसीएफ पथक व ३८ होमगार्ड आदी कर्मचारी रुट मार्च मध्ये सहभागी झाले होते, सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments

|