Header Ads Widget


शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेकफिस्टा 2024 चे आयोजन....

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी / प्रा.गणेश सोनवणे



   पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, शहादा येथे अणुविज्ञान व दुरसंचार विभागाच्या वतीने टेकफिस्टा 2024 चे आयोजन करण्यात आले.

     नंदुरबार जिल्हाच्या शहादा येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात अणुविज्ञान व दुरसंचार विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या टेकफिस्टा-2024 या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाचे संचालक मयुरभाई दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी विविध विद्याशाखांचे प्राचार्यांची उपस्थिती होती.या टेकफिस्टा-2024 च्या अंतर्गत टेक्नीकल व नॉनटेक्नीकल असे विविध दहा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी फार मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला. या सर्व कार्यक्रमांमध्ये ठराविक निकष लावण्यात आले. त्यानंतर प्रथम व व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अणुविज्ञान व दुरसंचार विभागाचे विभाग प्रमुख प्रा. व्हि. के.पाटील, टेकफिस्टाचे संयोजक प्रा. एस. पी. पाटील, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. जी. जी. भदाणे, प्रा. सौ. जे. एच. पाटील, प्रा. एन. सी. पाटील प्रा. व्हि बी. नेरकर, पी. एम. पटेल, आर. एम. पाटील, संजय पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदिशभाई जी. पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. एस. पाटील, कुलसचिव बी. आर. पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

|