Header Ads Widget


बिबट्याची मान अडकली चक्क तांब्याच्या हंड्यात;मोठ्या शर्थीने सुखरूप सुटका करण्यात आले वनविभागाला यश•••

 




 साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याची मान पाण्याच्या हंडयात अडकल्याची घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घोगशेवड गाव शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांसह घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन

बेशुद्ध केले. त्यानंतर हंडा कापून काढून बिबट्याची सुटका करण्यात आली. साक्री तालुक्यातील कोडाईबारी वन क्षेत्रातील जयराम नगरपैकी घोगशेवड शिवारातील कृष्णा नारायण चौरे (रा. देवळीपाडा) यांच्या शेतात गुरांच्या वाड्यात

पहाटेच्या सुमारास पाणी व भक्ष्याच्या शोधात एक मादी जातीचा बिबट्या आला, तांब्याच्या हंड्यात पाणी असावे म्हणून त्याने पाणी पिण्यासाठी हंड्यात मान टाकली. मात्र त्याची मान या हंड्यात अडकली. शर्थीचे प्रयत्न करूनही त्याची मान हंड्याच्या बाहेर निघू शकली नाही. शेवटी हा बिबट्या बाड्यात जाऊन बसला. बिबट्याच्ची मान हंड्यात अडकल्याचे दिसताच सदर घटनेची माहिती शेतमालकाने पहाटे वनअधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची मान हंड्यात अडकल्यामुळे त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन त्यास बेशुद्ध केले. पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला पिंपळनेर वनविभागाच्या आवारात आणले. त्यानंतर कटर मशीनच्या साहाय्याने तांब्याच्या हंड्याला कट करून त्यात ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली व हंडा बाहेर ओढून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली यासाठी पिंपळनेर, कोडाईबारी वनविभागाचे अधिकारी ,कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, वन्यजीव संरक्षण संस्था व स्थानिक ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

|