Header Ads Widget


सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र संघटनात्मक 21 वे अधिवेशन (पक्ष संगिती) सपन्न;सत्यशोधक कॉम. आर. टी. गावीत यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदी सर्वांनुमते निवड

 




निजामपूर/प्रतिनिधी 


दिनांक 29 फेब्रुवारी 2024 व 1 मार्च 2024 रोजी निजामपूर (जैंताणे )साक्री जिल्हा धुळे येथे सत्यशोधक कम्युनिष्ट पक्षाचे दीड दिवसाचे अधिवेशन पार पडले शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता आदिवासी क्रांतिवीरांगना झलकारीबाई नगर , दिवंगत कॉम. भिलक्या गावित विचार मंच ,येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले रचित सत्याचा अंखड़ गायन करून सभासद नोंदनी व 21 वे संघटनात्मक राज्य अधिवेशन पक्ष संगितीला सुरूवात झाली रात्रि 11.30 वाजे पर्यत सर्व उपसमितीचा हिशोब संघटनात्मक अहवाल वाचन करण्यात आले, दुसऱ्या दिवसी ठराव वाचन व ठराव पर भाषणे झाली या वेळी आगामी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली, यासाठी सत्यशोधक कम्युनिष्ट पक्षाची तालुका/जिल्हा वाईज कमिट्या तयार करून पक्षाची जबाबदाऱ्या देण्यात आल्या पुढीलप्रमाणे; नंदूरबार जिल्हा अध्यक्ष पदी कॉम. आर. टी. गावित यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी कॉम. रंजित गावित व संघटक म्हणून कॉम. विक्रम गावित याची बिन विरोध निवड करण्यात आली आहे.





 आणि काही तालुका कमिट्यांमध्ये नवीन कार्यकर्त्यांना संघटना पक्ष वाढीसाठी त्यांचे कार्य व जबाबदारीने योग्य त्या कमिट्यांमध्ये सामील करण्यात आले आहे,यावेळी महाराष्ट्र भरातूंन 410 प्रतिनिधि उपस्थित होते या वेळी कॉम. करणसिंग कोंकणी,कॉम.किशोर ढमाले,कॉम,सुभाष दादा काकुस्ते (लाल निशान लेनिन वादी पक्षाचे अध्यक्ष )विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी, कॉम. वंजी गायकवाड कॉम.यशवंत मालचे ,कॉम.होमाबाई गावित कॉम. जमुनाताई ठाकरे,सुरेश मोरे,वामन निकम ,अशपाक कुरेशी,दिलीप गावित, रामलाल गवळी ,सेल्या गावित यानी मार्गदर्शन केले.




यावेळी कारपोरेट जातपितृसत्तेकतेच्या शोषणातून स्रियाची मुक्ती करण्यासाठी समस्त सर्वरहारा स्रियांची एकजूट विकसित करा, शेती व शेतकरी यांच्या मागन्या संबंधातील ठराव, कारपोरेट ब्राम्हणी फॅसिझमचा पाडाव करण्यासाठी लोकशाही शक्तीची अभेद एकजूट करा व सह पुढील प्रमाणे ठराव करण्यात आले, 1) स्त्री पुरुष समतेचा स्वतंत्र आदिवासी कायदा करा.

2) कुपोषण व आदिवासी स्त्रीयांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील ठराव भारतीय नागरिकांना आरोग्याचा हक्क द्या -

३) आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा अंमलात आणून पती-पत्नीच्या नावे संयुक्त ७/१२ उतारा द्या.

४) आदिवासी विरोधी वन कायदा 2023 रद्द करा 

५) शेतकरी या व्याख्येत स्त्रीयांचा समावेश करा दिल्ली शेतकरी आंदोलनाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करा.

६) महाराष्ट्रात स्त्री हिंसेच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी भुमीका व मागण्या लागु करा.

७) आदिवासींवर अत्याचार करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर कारवाई करा.

८) स्त्रीयांना प्रतिष्ठा मिळवुन देण्यासाठी उपाययोजना करा

९) बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांवर नवा खटला दाखल करा.

१०) वन्यजीवांपासुन आदिवासीना संरक्षण द्यावे. अवकाळी पाऊसाच्या नुकसानीची भरपाई द्या.

११) रेशन व्यवस्था बळकट करा.

१२) ऊस तोडणी मजुरांना न्याय द्यावा.

१३) २५ डिंसेंबर मनुस्मृती दहन दिन हाच भारतीय स्त्री मुक्तीदिन जाहीर करा.

१४) डाकीण प्रथा बंद करण्यासाठी विशेष मोहिम राबवा.

१५) स्त्री शोषणाविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार करणारा ठराव

१६) पवन उर्जा, समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन इत्यादी नावाखाली जमीन लुटण्याचा प्रयत्नाचा निषेध

१७) आदिवासी हे मूलनिवासी असूनही त्यांना वनवासी म्हणणाऱ्या व आदिवासीना डी लिष्टींग च्या नावाने आदिवासीत्व नाकारणाऱ्या संघटना व व्यक्तींवर अॅट्रॉसिटी

अॅक्ट अंतर्गत कारवाई करा.

१८) अल्पसंख्यांक, आदिवासी, भटकेविमुक्तांवरील सामुहीक हल्ल्याचा निषेध.

१९) नवे शैक्षणिक धोरण विरोधी ठराव.

२०) दारिद्रयरेषे बद्दलचा ठराव

२१) जातनिहाय जनगणना करा.

२२) लोकशाही वाचवा, संविधान वाचवा. देश वाचवा ठराव

२३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवार वाडा वगळा

२४) आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे २ कोटी रुपयेचे शासकीय अनुदान रद्द करा.

25) शहरी व ग्रामिण रोजगार हमी योजना अमलात आणण्याचा ठराव

26) पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्य व आदिवासी विद्यापीठ स्थापन करा व आदी.


Post a Comment

0 Comments

|