Header Ads Widget


Aimim पक्षाच्या औरंगाबाद महिला कार्याध्यक्षपदी अंकिता गजास यांची सर्वांनुमते बिनविरोध नियुक्ती जाहीर...

 





औरंगाबाद/ प्रतिनिधी 


Aimim पक्षाच्या औरंगाबाद महिला कार्याध्यक्षपदी अंकिता गजास यांची नियुक्ती करण्यात आली; महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महिला प्रदेश अध्यक्ष कीर्ती डोंगरे,प्रदेश कार्याध्यक्ष रुहीनाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष फिरदोस फातेमा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, रहेमानिया कॉलनी येथील महिला कार्यालयावर नियुक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या ठिकाणी अंकिता गजास यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर,युवा जिल्हाध्यक्ष मुन्शी भैय्या पटेल,युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान,शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अनिस पटेल,युवक जिल्हा महासचिव शेख कलीम,कामगार अध्यक्ष काकासाहेब काकडे,युवा नेते प्रांतोश वाघमारे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत...

Post a Comment

0 Comments

|