Header Ads Widget


संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन भारत बंद निमित्ताने सत्यशोधक शेतकरी सभेचा नवापूर येथे रस्ता रोको आंदोलन.........


नवापूर/प्रतिनिधी

गेल्या 2 वर्षा पूर्वी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चा च्या बॅनर खाली अनेक देशभरातील शेतकऱ्याच्या संघटना एकत्र येत भाजप सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात 3 कृषी कायदे केले होते त्यांच्या विरोधात दिल्लीच्या चारही बॉर्डर वर ठीया आंदोलन केले ते आंदोलन एक वर्ष पेक्षा जास्त काळ चालले त्यावेळी बिजिपी सरकार ने काळे कायदे रद्द केले. त्यावेळी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले होते त्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणारा map गॅरंटी कायदा करण्याचे आश्वासन सह अनेक मागण्या बाबत दिले होते ते आज पर्यंत बीजिपी सरकारने अंमल बजावणी केली नाही त्याच प्रमाणे महाराष्ट्रत सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने दिनांक 7/12/2023 रोजी सत्यशोधक पायी बिढार महामोर्चा काढण्यात आला होता मोर्चा नंदुरबार ते धुळे,मालेगाव मार्गे नासिक पर्यंत पोहचल्यावर मां.उप मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस यांनी नागपूर येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी बोलविले त्या वेळी मोर्चेकऱ्यांन दिलेल्या लेखी आश्वासन ची अंमलबजावणी 2 महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही सुरू नसल्या मुळे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने वरील दोन्ही लेखी आश्वासन ची आठवण करून देण्यासाठी सयुंक्तं किसान मोर्चाचे ग्रामीण भारत बंद ची हाक दिली आहे त्या निमित्ताने सत्यशोधक शेतकरी सभा दिनांक 16/02/2024 रोजी रस्त्यावर उतरत रस्ता रोको आंदोलन करणार आहे. यावेळी प्रमुख मागण्या 1) शेतकऱ्यांच्या कांदा कापसी ,दुधासह सर्व शेती पिकांना हमीभाव देणारा msp गॅरंटी कायदा करा. 2) शेतकरी विरोधी वीज संशोधन कायदा रद्द करा. 3) आदिवासींना बेदखल करणारा वन कायदा 2023 कायदा रद्द करा. 4) आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) कायदा 2006 व नियम 2008 सुधारित अधिनियम 2012 ची योग्य रीतीने अंमलबजावणी करून मालकी हक्क वारस नोंद सिद्ध करणारा सातबारा उतारा द्या.5) पंचायत विस्तार अधिनियम 1996 पेसा कायद्याची अंमलबजावणी करा.6) राज्याचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करा. 7) मा. जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिक वन हक्क दाव्यांचे काढलेल्या अंतिम नोटीसा मागे घ्या. 8) प्रलंबित वैयक्तिक वन हक्क दाव्यांची फेर तपासणी करून सातबारा उतारा द्या 9) आदिवासींचे आरक्षण बिगर आदिवासींना देऊ नये 10) भाजपाचे असंवैधानिक डि लिस्टिंग मागणी मान्य करू नये. 11) कांद्यावरील निर्यात बंदी उठवा.12) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. 13) चुकीचे प्रमाणपत्र दुरुस्त करा. 14) बारी येथे जंगल तस्करीच्या नावाने विधवा बाई एमुबाई नाईक यांचे घर फोडणारे व बंधारी बाई रामा नाईक यांचे घर फोडून घर उपयोगी पलंग दोन सेट चोरणाऱ्या वन खात्याचे अधिकारी यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून जप्त केलेले पलंग परत करा. 15)नवापूर येथील M IDC अंतर्गत जबरदस्तीने आदिवासीच्या जमिनी अधिकग्रहन करणे बंद करा व अशा बेकायदेशीर पने अधिग्रहण केलेल्या जमिनी आदिवासींना परत करा ..या सह इतर स्थानिक मागण्यांबाबत रस्ता रोको आंदोलन करणार असून या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सत्यशोधक शेतकरी सभा करीत आहे आपले कॉम. करणशिंग कोकणी कॉम.आर.टी.गावित कॉम.रणजित गावित कॉम.दिलीप गावित कॉम.विक्रम गावित कॉम.शीतल गावित कॉम गेवा बाई गावित , होमाबाई गावित , जबनाताई ठाकरे,लीलाताई वळवी,नीबु बाई मांवची,रंगू बाई मावची देवीदास पाडवी, सेल्या गावित व आदी यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|