Header Ads Widget


संयुक्त किसान मोर्चाचे भारत बंद आव्हानांला नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने पिंपळनेर चौफुलीवर रस्ता चक्का जाम आंदोलन ...



नवापूर/प्रतिनिधी

आज सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी लढेगे जीतेंगे , शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव देणारा एमएसपी गॅरंटी कायदा करा, एकच नारा साथ बारा उतारा असा नारा देत देवळफळी स क.प. कार्यालय  नवापूर पासून रॅलीला सुरुवात झाली घोषणा देत नगरपालिका मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्याला पुष्पहार करून मोर्चा लाईट बाजार,कुंभारवाडा , नई होंडा ते पिंपळनेर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले आंदोलनात हजारो आदिवासी सहभागी झाले होते. दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनाला जे आंदोलन एक वर्ष पेक्षा जास्त काळ चालले त्यावेळी भाजप सरकार ने काळे कायदे रद्द केले त्यावेळी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले होते की , शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणार एम एस पी गॅरंटी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु लोकसभा निवडणूक तोंडावर आले असता भांडवलदार व  कार्पोरेट घराणे यांचा हितासाठी  सरकारने देशाची तिजोरी मोकळी केली असून शेतकऱ्यांच्या, कामगार कष्टकऱ्यांचा मागण्या याकडे दुर्लक्ष करीत आहे निवडणूक जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करीत असून लोकशाही कमजोर करीत आहेत दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलकांना रस्त्यावर ते येऊ नये म्हणून रस्ते बंद केलेले आहेत.  त्यासाठी सयुंक्तं किसान  मोर्चाने ग्रामीण भारत बंद ची हाक दिली आहे तसेच सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने दिनांक ७/१२/२०२३ रोजी नंदुरबार ते  मुबई पायी बिढार महामोर्चा काढण्यात आला होता त्यात प्रमुख मागण्या बाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासन ची अंमलबजावणी दोन महिने उलटून ही कोणतीही कार्यवाही सुरू नाही या बाबत शासनाला जाब विचारण्यासाठी चक्का जाम रस्ता रोको करण्यात आला.3 तासापेक्षा जास्त वेळ रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे हजारो वाहनाची रांगच रांग लागली होती यावेळी बारी येथे जंगल तस्करीच्या नावाने विधवा महिला इमुबाई नाईक यांचे घर फोडणाऱ्या व बंधरी बाई रामा नाईक यांचे घर फोडून घर उपयोगी पलंग चोरणाऱ्या वन खात्याचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केल्या शिवाय रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा मोर्चेकऱ्यानी घेतल्या नंतर सदर जप्त केलेले पलंग ताबडतोब देण्याचे आदेश पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिले तसेच बेडकिपाडा येथे सुरू असलेले वन हक दावेदराच्या जमिनीत लघुपाट बंधारा जो पर्यंत बाधित होणाऱ्या वन हक दावेदाराची पर्यायी व्यवस्था पुनर्वसन होत नाही तो पर्यंत काम बंद करा सह खालिल मागण्याबाबत प्रशासनाला धारेवर धरले 1) शेतकऱ्यांच्या कांदा कापसी ,दुधासह  सर्व शेती पिकांना हमीभाव देणारा एमएसपी गॅरंटी कायदा करा. 2) आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) कायदा 2006 नियम 2008 सुधारित अधिनियम 2012 ची अंमलबजावणी करा 3) कॉरोना काळात जिल्हाधिकऱ्यांमार्फत आदिवासीं ना जमिनीतून बेदखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या अंतिम नोटिसा रद्द करा व स्थळ पाहणी तसेच gps मोजणी करून 1996 पेसा कायद्याची अंमलबजावणी करा..  3) कांद्यावरील निर्यात बंदी उठवा ४)शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. 5 ) नवापूर सह नंदुरबार जिल्हा सरसकट दुषकाल जाहीर करून नुकसान भरपाई द्या 6) आदिवासीं शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करा  7) वन कायदा 2023 रद्द करा 8)  नवीन वीज कायदा रद्द करा  सह सत्यशोधक पायी बिढार महामोर्चा ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासन ची अंमलबजावणी करा सह स्थानिक व महाराष्ट्र, सरकारच्या व केंद्रसरकडे प्रलबित असलेल्या 40 पेक्षा जास्त मागण्याचे निवेदन  पंतप्रधान महोदय व  मुख्यमंत्री  यांना निवेदन नायबतहसिलदार जितेंद्र पाडवी,  पोलिस निरक्षक ज्ञानेशवर वारे   यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी सत्यशोधक कॉम.आर.टी.गावित रामसिंग गावित, करणसिंग कोकणी,रणजित गावित,गेवा बाई गावित,होमा बाई गावित,शांता बाई गावित,रंगू बाई मांवची राज्या गावित रामदास गावित दिलीप गावित देवीदास पाडवी ,विक्रम गावित सल्या गावित ,सह हजारो सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,उपनिरीक्षक जगदीश सोनवणे,पो हे का दादाभाई वाघ,नितिन नाईक,गणेश बच्छे,सुरेंद्र पवार,विनोद पराडके,समाधान केंद्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments

|