Header Ads Widget


मौलाना अबुल कलाम आज़ाद रेसि. उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज अक्कलकुवा येथे वार्षिक स्नेहसम्मेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न....

         
    

शेख इलियास   
अक्कलकुवा/ प्रतिनिधी   
         
        अक्कलकुवा येथील मौलाना अबुल कलाम आज़ाद रेसि उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज अक्कलकुवा येथे वार्षिक स्नेहसम्मेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी हे होते तर प्रमुख पाहुणे वैद्यकीय शाखेचे अखलाक शेख उपस्थित होते.
    कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य रफीक जहागिरदार यांनी केली त्यात त्यांनी शाळा व महाविद्यालयात वर्षभर आयोजित विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देउन इ.१० वी व इ.१२ वी मंडळाची परीक्षा कॉपी मुक्त परीक्षेबाबत ही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मौलाना गुलाम मोहम्मद वस्तान्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा व महाविद्यालयाने आयोजित विविध स्पर्धा, कार्यक्रम तसेच शाळा व महाविद्यालयाची प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे बाबत प्रयल करावे जामिया सर्व प्रकारची शैक्षणिक मदत करण्यास तयार आहे. आम्ही जामिया मध्ये तुमच्यासाठी केजी ते पीजी पर्यत अभ्यासक्रम सुरू केले असुन त्याचा तुम्ही उचित फायदा घ्यावा. या प्रसंगी अखिल भारतीय कुरान पठण स्पर्धेत प्रथम आलेल्या शाळेतील इ.०७वी चा विद्यार्थी हाफीज इस्माईल यासीर यास शाळेतील कर्मचा-यांच्या वतीने रोख रक्कम ११०००/- चे बक्षिस देण्यात आले.
       या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नात, अलवीदाई गीत, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. वर्ष भरात विविध स्पर्धेत तसेच महाविद्यालयात प्राविण्य मिळविणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचे व शाळेतील मुख्याध्यापक रफीक जहागिरदार यांना शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाचा वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शाळा व संस्थेच्या वतीने मौलाना वस्तानवी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इ.१०वी व इ.१२वी परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्याचा निरोप संभारभ ही करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद ईग्तीयाजअली व रियाज तेली यांनी केले तर आभार प्रदर्शन उप प्राचार्य इमरान शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

       

Post a Comment

0 Comments

|