धावडे - धावडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वही पेन उपक्रम राबविण्यात आला. गावात महराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्वराज्य बहुउद्देशिय संस्था स्थापन करण्यात आली या उद्देशाने जि. प. मराठी शाळा धावडे येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत विध्यार्थ्यांना पेन व वहिच्या स्वरूपाने साहित्य वाटप करण्यात आले व मुलांना संस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळेस मान्यवरांकडून जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिवाजी महराजांना जिजाऊ मातेंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले त्याबाबत प्रबोधन करणात आले.
या वेळी उपस्थित मान्यवर स्वराज्य बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी,उपाध्यक्ष भावनाथ कुवर, सचिव रावसाहेब पाटील, खजिनदार रविंद्र रामराजे, व सदस्य प्रफुल पिंपळे, चंद्रमनी सामुद्रे, लक्ष्मण कुवर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच अमृत सूर्यवंशी, माझी सदस्य विट्ठल पाटील, जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रविण टाकणे सर, छगन वसावे सर, दिनेश सांगळे सर, अंगणवाडी शिक्षिका अनिता गिरासे, आरस्तोलबाई गिरासे, वंदना पाटील, मदतनीस वंदना बेडसे, मनीषा पाटील व शाळेतील मुले व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments