Header Ads Widget


सातारा परिसरातील भीमशक्ती नगर या ठिकाणी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन


औरंगाबाद/  प्रतिनिधी 

सातारा परिसरातील वार्ड क्रमांक 115 भीमशक्ती नगर या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या स्थानिक विकास निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात येणार आहे या कामाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सय्यद इम्तियाज जलील हे उपस्थित होते साताऱ्याचे माजी सरपंच फिरोज पटेल यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिम औरंगाबाद युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान, युवा जिल्हा महासचिव शेख कलीम, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अनिस पटेल ,वार्ड क्रमांक 115 अध्यक्ष साबेर पटेल ,पश्चिम विधानसभा प्रवक्ता अजहर पटेल, पश्चिम विधानसभा प्रभारी शकील पटेल, फिरोज खान ,मोहम्मद शफीक, शेख गैस,अनिल यादव,कय्युम पटेल, बबलू पटेल,मतीन पटेल आदींसह गावकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी खासदार सय्यद इम्तियाज जलील आणि येणाऱ्या मान्यवरांचे वार्डातील नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पटेल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

Today is Friday, May 2. | 2:00:36 PM