Header Ads Widget


शिवजयंती निमित्त साक्री तालुक्यात वाचनालयाच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

साक्री प्रतिनिधी /अकिल शहा

साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून धाडणे च्या गुंजन अहिरराव तर उच्च माध्यमिक गटातून कु. ज्ञानदा साळुंके यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

शिवजयंती निमित्त वाचनालयच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष तथा तहसीलदार साहेबराव सोनवणे होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह प्रा. डी. एन. खैरनार, सहकार्यवाह विजय भोसले, संचालक प्रा. विनय शाह, आर.डी.भामरे, धनंजय सोनवणे, जगदीश वाघ, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. एल. जी. सोनवणे, सचिव आर.पी.भामरे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिवजयंती निमित्ताने 9 फेब्रुवारी रोजी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली होती. माध्यमिक गटासाठी जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज / शिवारायांचे मावळे व आजचा तरुण तर उच्च माध्यमिक गटासाठी शिवशाही ते लोकशाही / आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर... असा विषय देण्यात आला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. जहागीरदार साळुंके व श्री संजय देवरे होते.

स्पर्धेचा निकाल स्पर्धेचे समन्वयक पी. झेड. कुवर यांनी जाहीर केला. माध्यमिक गटात प्रथम - गुंजन देविदास अहिरराव, कर्म. शं. ची. बेडसे विद्यालय धाडणे, द्वितीय - कु. नेहा दिलावरसिंह गिरासे, आदर्श मा. वी. साक्री, तृतीय - करीना हंसराज भामरे, बहुउद्देशीय विद्यालय कासारे, तर उत्तेजनार्थ करण मोतीलाल सोनवणे, भानुबेन वाणी पब्लिक स्कुल निजामपूर व रितेश दिवाकर नांद्रे, न्यू इंग्लिश स्कुल साक्री. यांना प्रत्येकी 700, 500, 300, 100 रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्र देण्यात आले.

उच्च माध्यमिक गटात प्रथम - कु ज्ञानदा उदय साळुंके, न्यू इंग्लिश स्कुल साक्री, द्वितीय - प्राची राजेंद्र देसले, सी. डी. देवरे माध्य. विद्यालय म्हसदी, तृतीय ( विभागून ) - निकिता नरेंद्र पाटील, बी.जी.पाटील मा. वि. धनेर व कु. ख़ुशी प्रविण पाटील, न्यू इंग्लिश स्कुल साक्री.यांना प्रत्येकी 1000, 700, 500 रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्र देण्यात आले.

प्रथम क्रमांकासाठी रोख बक्षीस प्रा. विनय शाह,द्वितीय क्रमांकासाठी रोख बक्षीस विजय भोसले,तृतीय क्रमांकासाठी रोख बक्षीस प्रा.डी.एन.खैरनार तर उत्तेजनार्थ रोख बक्षीस पी. झेड कुवर यांचेतर्फे देण्यात आले. या व्यतिरिक्त विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या साठी प्रा. एल. जी. सोनवणे यांनी कु. दुर्गेश्वरी पाटील व कु. नेहा गिरासे यांना प्रत्येकी 100 रुपये, वाचनालायचे नियमित वाचक सुभाष भटू सोनवणे यांनी गुंजन अहिरराव, नेहा गिरासे व कु. वैष्णवी दहिते यांना प्रत्येकी 100 रुपये तर कवी रावसाहेब कुवर यांनी कु. निकिता पाटील हिला 200 रुपये वैयक्तिक बक्षीस दिले.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार सोनवणे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या वक्तृत्व गुणांचे कौतुक करीत प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास नगरसेविका जयश्री पगारिया,नगरसेविका उषाताई पवार,नगरसेविका पुनम काकूस्ते, प्रा.एस.एन. खैरनार, सतिष पेंढारकर, भावसार सर, दिपक नांद्रे यांचेसह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संचालकांसह ग्रंथपाल उज्वल अग्निहोत्री, निलेश रामोळे, कुवर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|