Header Ads Widget


अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साक्रीत प्रेस क्लब व जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन..

 


साक्री/प्रतिनिधी: अकिल शहा 

आज सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमाराससाक्री शहारातील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त साक्री पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी साक्री पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी, पोलीस नाईक आनंद चव्हाण, प्रेस क्लबचे संस्थापक आबासाहेब सोनवणे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष अकिल शहा,ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते, विद्यानंद पाटील, शरद भाऊ चव्हाण, जगदीश शिंदे, जितेंद्र जगदाळे, संघपाल मोरे, कल्पेश मिस्तरी, ज्ञानेश्वर ढालवाले, ज्ञानेश्वर शिवदे, जितेंद्र गुरव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|