Header Ads Widget


नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस.यांचे जाहीर आव्हान आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होईल गुन्हा दाखल..




नंदुरबार/प्रतिनिधी 

नंदुरबार जिल्ह्यातील सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलिस दलाचा सायबर सेल लक्ष ठेवून असून, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी दिला.

जिल्ह्यात दोन दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना श्रवण दत्त एस.यांनी सांगितले, काही अपप्रवृत्ती मीडियाचा वापर चांगल्या कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्यातील घटनांचा संबंध नसताना इतर ठिकाणी घडलेल्या घटनांचे व्हिडीओ, मजकूर आणि पोस्टर्स, फोटो फॉरवर्ड केले जात आहेत. यामुळे तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तीन गुन्ह्यांपैकी दोनमध्ये १७ ते २० वयोगटातील मुलांचा समावेश आहे. ही बाब चिंतनीय आहे. सोशलकामासाठी, माहितीसाठी शिक्षणासाठी करा. आक्षेपार्ह बाबी टाकून कायद्याच्या कचाट्यात अडकू नका. स्वतःचे आणि कुटुंबाचेही यामुळे नुकसान करू नका, असे आवाहनही पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे. सायबर सेल सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. पोलिस स्वतःहून तक्रार दाखल करून घेणार असून, कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments

|