Header Ads Widget


दुचाकी(Two Wheeler) वाहनांसाठी वाहन नोंदणी एमएच39एएन (MH.39.AN)क्रमांकाची नवीन मालिका सुरु...-किरण बिडकर(उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)



नंदुरबार/प्रतिनिधी

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर एमएच39एएन ही स्वंयचलित नविन मालिका सुरु होणार असून ज्या वाहन धारकांना दुचाकी वाहनाकरीता आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा आहे अशा वाहनधारकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

विहीत नमून्यातील अर्ज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,नंदुरबार येथे उपलब्ध असून प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या धर्तीवर अर्जदारास त्यांचा पसंतीचा आकर्षक क्रमांक देण्यात येईल. एका क्रमांकासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलावाद्वारे तो नोंदणी क्रमांक देण्यात येईल, यांची वाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही श्री. बिडकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Post a Comment

0 Comments

|