Header Ads Widget


मन्सुरी पिंजारी सामाजिक संस्था शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहीक विवाह सोहळा संपन्न...


शहादा/प्रतिनिधी

दि. 07 जानेवारी 2024 रोजी मन्सुरी पिंजारी सामाजिक संस्था शहादा या संस्थे कहुन 07 जोडप्यांचे सामुहीक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला, समाजात होणाऱ्या अवाजवी खर्च टाळण्यासाठी व समाज एकजुट राहण्यासाठी अशा प्रकारचे अनोखे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री. अहेमद शमशोद्दीन मन्सुरी यांनी सांगितले, संस्थेचे उपाध्याय श्री. साजिद रहीम पिंजारी व सर्व पदाधिकारी व संचालक परवेज बिस्मील्लाह पिंजारी,आसिफ मजीद पिंजारी, सद्दाम मोह‌म्मद ‌मन्सुरी, अनिस भिक्कन पिंजारी, अजीज जब्बार पिंजारी,बिलाल बशीर पिंजारी, हाजी मोहसीन शब्बीर मन्सुरी, रहीम हाजी मेहताब मन्सुरी, साबीर मुशीर पिंजारी, हनिफ गुलाम हुसैन पिंजारी, डॉ. रिजवान हाजी शब्बीर, डॉ.रौशन नवाज शे.अफजल मन्सुरी, गफ्फार इमाम पिंजारी, अल्तमश कलीम पिंजारी, युसूफ शब्बीर पिंजारी, मोहमीन निसार पिंजारी, मुस्तकीम शकील पिंजारी,अमीन उम्मान पिंजारी, इदरीस गुलाम पिंजारी, आणि सल्लागार हाजी रहीम हाजी हनिफ पिंजारी,व अफजल कादीर मन्सुरी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. आरीफ अली मन्सुरी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. हाजी कलीम हाजी हसन मन्सुरी यांनी भुषविले या वेळी सुत्र संचालन हाजी कलीम रमजान मन्सुरी (सर) यांनी केले व आभार प्रकटन हाजी युनूस सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली,

व यापुढेही मन्सुरी पिंजारी सामाजिक संस्थेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतील असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अहेमद शमशोद्दीन मन्सुरी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

|