Header Ads Widget


सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण नियोजन बैठक..


नंदुरबार/प्रतिनिधी

काल नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयत सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभ व विविध विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बेठक पार पडली .सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुबई पायी बिढार महामोर्चा 262 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर नासिक येथे अडवल्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे 50 मिनिटे चर्चा करून 13 प्रमुख मागण्या मान्य केल्या व 40 सर्व मागण्यांसंदर्भात विविध शासकीय विभागना निर्देश पर पत्र दिले हे पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री मोर्चेकर्यास् मोर सादर केले यातील निर्देशानं नुसार विविध मांगण्या च्या अंमलबजावणी संदर्भात आज बेठक घेण्यात आली यात प्रमुख मागण्या बाबत चर्चा करून अंमलबजावणी संदर्भात नियोजन करण्यात आले. 
1) नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करन्यासाठी फेरआढावा घेऊन आदिवासीं वनहक दावेदारासह सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे सूचना मा. जिल्हाधिकऱ्यांमार्फत देण्यात आले.
2) नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या 2 कर्ज माफी योजनेचा लाभ आदिवासी शेतकऱ्यानं मिळाला नाही . थक्तीत कर्ज असूनही लाभ मिळाला नाही त्यांची यादी प्रसिद्ध करून कर्ज माफी का मिळाली नाही त्यांचे कारणे व कर्जमाफी चां प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले .तसेच रेगुलर कर्ज भरनारे शेतकरी यांना घोषित झालेले 50 हजार रुपये प्रोत्साहन दान अजून पर्यंत दिले नसतील अशाची यादी प्रसिद्ध अनुदान करून त्यांना लाभ का दिला नाही याचे करणे देण्याचे आदेश देण्यात आले व सर्व बँकांना कर्ज माफी व कर्जमाफी पासून वंचित असणाऱ्या सर्व सभासदांचे यादी बँक वाईज सत्यशोधक शेतकरी सभेला देण्याचे आदेश दिले.
 3)आदिवासी वनहक दवेदरणा पीक कर्ज व इतर कर्ज अग्रक्रमाने देण्याबाबत आदेश देण्यात आले.
 4) आदिवासीं वन हक दावेदारांना कोरोणा काळात अंतिम नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसा मागे घेऊन सर्व प्रलंबीत वन हक दावेदारच जमिनीचे स्थळ पाहणी व जिपिएस मोजणी करण्यात येणार आहे त्याचा वेळा पत्रक 2 दिवसात जाहीर करण्याचे सांगितले.
 5) आदिवासीं वन हक कायद्या अंतर्गत वनपट्टे मिळाले आहेत त्यांना कुसुम सोलर योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यांना आता सदर योजनेचा अग्रकर्म देऊन लाभ देण्यासाठी आंनलाईन फॉरमॅट मध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचे साईट ओपन करून दाखवली व लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. 6)आदिवासीं वन हक दावेदराचे पीक नोंदणी कुठेच होत नसल्यामुळे पीक विमा योजना,दुष्काळ व इतर योजनेचा लाभा पासून वंचित होत असल्यामुळे ई पीक पाहणी aap मध्ये दरुस्ती होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पीक पेरा रजिस्टर ठेवण्याचे आदेशाची अमलबजा नी करण्याचे आदेश केले तसेच सर्व शासकीय योजनांच्या aap मध्ये दुरुस्ती करण्यात येणार,
  7) नंदुरबार जिल्ह्यात चुकीचे सामूहिक वनहकाचे आदेश रद्द करून वेयक्तिक वन हक दावेदराची कसत असलेल्या जमिनीचे क्षेत्र सोडून उर्र्वित क्षेत्र सामूहिक दावे म्हणून मंजूर करण्यात येणार आहेत. अश्या 40 मागण्यांसंदर्भात संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमलबजवणी करण्याच ठरले यावेळी वन खाते,बँक अधिकारी,आदिवासीं विकास प्रकल्प विभाग,कृषी अधिकारी,नवापूर नंदुरबार,चे तहसीलदार सह उपविभागीय जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते या वेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम. किशोर ढमाले , करणसिंग कोकणी .आर.टी.गावित..रणजित गावित .होमाबाई गावित .शीतल गावित . गेवा बाई गावित नीबुबाई मावंची, जमनाताई ठाकरे ,दिलीप गावित, विक्रम गावित,देवीदास पाडवी,सेल्या गावित जालामसिंग गावित, गोबजी गावित रामदास गावित, राज्या गावित ,सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|