नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व जनसेवा महिला स्वयंसहायता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सदा जनसेवा फाऊंडेशनचे राज्य उपाध्यक्ष सैयद मकसुद, सामाजिक कार्यकर्ते जकी अहमद पठाण, जनसेवा महिला स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष रुकसाना ए. बागवान, संचालक सैय्यद शकीला, आमेरा बागवान, शाहीन शेख, सायमा नाज, इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशचे सचिव दानिश बागवान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करुन झाली व यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात एजाज बागवान म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पुणे येथे पहिली शाळा सुरु केली. यावेळी सावित्रीबाई फुले यांना फातेमा शेख यांनी शिक्षणकामी मोलाची साथ दिली. व त्यांचे बंधू उस्मान शेख यांनी शाळेसाठी जागाही दिली व पूर्ण सहकार्य केले. फातेमा शेख ह्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. आजचा दिवस महिला मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवेश पिंजारी, दानिश खाटीक, आफाक शेख, कैफ सय्यद, साद शेख आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रिजवान बागवान तर आभार इरफान खाटीक यांनी मानले.
0 Comments