Header Ads Widget


नंदुरबार जिल्हा परिषद येथील याहा मोगी सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण संपन्न झाले.

नंदुरबार (प्रतिनिधी) -  जिल्हा परिषद येथील याहा मोगी सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण संपन्न झाले.

जिल्हयातील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी यासाठी .राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहचावी यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते . प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे , प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले , जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम .डी . धस , जिल्हा आरोग्य अधिकारी  आर बी सोनवणे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अमित पाटील , पुंड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे  कार्यकारी अभियंता शेखर मराठे  आदी उपस्थित होते .

प्रशिक्षणात  जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक किशोर सोनवने  यांनी पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण , लाल कार्ड पिवळे कार्ड , हिरवे कार्ड ,जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितिन पाटील  यांनी पाणी गुणवत्ताविषयक शासन निर्णय, पाणी नमुने तपासणी , पाणी नमुने तपासणीचे माणके , रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहिम व दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे विविध आजार याविषयी मार्गदर्शन केले .

प्रशिक्षणाचे

प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम .डी. धस यांनी केले प्रशिक्षणास पंचायत समितीचे सर्व गट विकास अधिकारी , सर्व तालुका वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी , जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेचे कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते . सूञसंचालन व आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी मानले .

Post a Comment

0 Comments

|