Header Ads Widget


शिवसेना (उ. बा. ठाकरे) पक्षाच्या वतीने सोरापाडा येथील श्री. कालिका माता मंदिराच्या भव्यसभा मंडपात होऊ द्या चर्चा व युवती संवाद सभा कार्यक्रमाचे आयोजन...

अक्कलकुवा/प्रतिनिधी 

       देशातील सामान्य जनता ही महागाई आणि बेरोजगारीने झुंजत असतांना मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील कठपुतली शिंदे सरकार हे आपल्या मस्तीत आहेत. राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहेत मात्र आरोग्य मंत्र्यांना रुग्णालयांकडे पाहण्यास वेळ नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याची राज्यात स्थिती आहे त्यामुळे या दोन्ही सरकारांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ जवळ येत आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोरापाडा येथील श्री कालिका माता मंदिराच्या भव्यसभा मंडपात होऊ द्या चर्चा  व युवती संवाद सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आ.पाडवी बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, राज्य वक्ता नाना तिडके, जिल्हा उप प्रमुख मंगलसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, तालुकाप्रमुख मगन वसावे,
युवा सेनेच्या जिल्हा विस्तारक कामिनी देसले, राज्य सहसचिव मालती वळवी, जिल्हा युवा समन्वयक रोहित चौधरी, युवा जिल्हधिकारी ललित जाट,   हिरामण पाडवी, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, नटवर पाडवी, सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र वसावे, विनोद वळवी, शहर प्रमुख  रावेंद्रसिंह चंदेल, खापरचे माजी सरपंच  जोलु वळवी किरण चौधरी, आदी  उपस्थित होते. यावेळी राज्यात व देशात सुरु असलेली हुकूमशाही ,महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोजगारांचे खाजगीकरण, शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण, गगनाला भिडणारी महागाई, अशा विविध विषयांवर होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी लक्ष्मण वाडीले, विस्तारक कामिनी देसले, ललित जाट, मालती वळवी, हिरामण पाडवी, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले होऊ द्या चर्चेच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील शिवसेनेचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|