प्रतिनिधी/ शहादा
आई म्हाळसादेवी मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत
येथील डोंगरगाव रोडवरील म्हाळसा नगरात आई म्हाळसादेवी ची स्थापना ऑक्टोबर 2019 ला कोजागिरी पौर्णिमेला करण्यात आली होती. मंदिर परिसर रोज भाविकांचा दर्शनाने फुललेला असतो . म्हाळसा देवी ही बाराबलुतेदारांची कुलदेवता आहे . तालुका व शहाराह मोठ्या प्रमाणात विविध जाती धर्मियांची कुलदेवता आहे . जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात मातेचा दर्शनासाठी गर्दी करतात . नुकताच शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यात मान्यवरांचा हस्ते आरती , रोज दुपारी महिला भगिनींनी दुर्गासप्तशतीचे पाठ वाचन केले नऊ दिवसात 188 पाठ वाचन करण्यात आले . पाठ वाचन वर्षा पाटील , रिना सोमवंशी या भगिनींनी केले त्यांना सहकार्य सेवा समितीचा सचिव विद्या सोनवणे सह सचिव सोनाली जयस्वाल सह परिसरातील महिला भगिनींनी सहकार्य केले . कुमारिका जेवण सह विविध कार्यक्रम घेण्यात आले
वर्धापन दिनानिमित्त होम हवंन व याग हा 28 तारखेस ( शनिवार)सकाळी सात ते दहा या वेळात होणार असून भंडारा प्रसाद हा 29 तारखेस ( रविवार) सायंकाळी सात वाजता आरती नंतर होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे
भंडारा प्रसाद प्राचार्य एस पी पाटील यांचाकडून आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम याहस्वीतेसाठी मंदिर सेवा समिती डॉ संगीता कलाल, सचिव विद्या सोनवणे उपाध्यक्ष निलेश सोनार, कार्याध्यक्ष वकिल पाटील , खजिनदार स्वप्नील पाटील, सहसचिव सोनाली जयस्वाल, सदस्य डॉ विजय कलाल, गणेश सोनवणे, संजय प्रकाशकर, डॉ लक्ष्मण सोनार, अजय सोनवणे, प्रा गणेश सोनवणे, निलेश देवरे, प्रा बी डी मराठे, प्रा विलास जावरे, गिरीश जावरे, भटू जव्हेरी, दीपिका शहा मेहनत घेत आहेत.
0 Comments