Header Ads Widget


आई म्हाळसा देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरा...

प्रतिनिधी  /शहादा
    आई म्हाळसा देवी मंदिरात नवरात्र निमित्त  विविध कार्यक्रम उत्साहात साजरे होत असून भाविकासोबत गोमाता देखील त्याचा आनंद घेत असल्याने भाविकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे .
    याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या नवरात्र सुरू झाल्याने डोंगरगाव रोडवरील म्हाळसा नगर परिसरातील म्हाळसा मंदिरात विवंध कार्यक्रम होत असून दिवसभरात शहारासोबतच जिल्ह्यातील कुलदैवत असणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून आपली सेवा देत आहेत . भाविक स्वतः हुन प्रसाद , देवीसाठी माळ, आणत आहेत . मातेची ओटी भरण्यासाठी देखील सकाळपासून महिला भगिनी सहकुटुंब येतात . 
     रोज सकाळी व सायंकाळी मान्यवरांचा हस्ते आरती होते तर गोंधळी सकाळी  सात वाजता येऊन भजन गाणे म्हणत देवीचा जागर करत आहेत त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले असून संपूर्ण परिसरात प्रसन्नता पसरली आहे . त्याचाच एक भाग म्हणून रोज देवीचे दुर्गा सप्तशतीचे  पाठ वाचन होत असताना गाय ( गो माता ) पाठ श्रावणासाठी येत असल्याचे चित्र आहे . चौथ्या माळेस गो माता पाठ श्रवणासाठी चक्क सेवेकरी महिला भगिणीचा मधोमध जाऊन बसल्याने भाविकांनी समाधान व आश्चर्य व्यक्त केले आहे . गाईची त्यावेळी पोळी देऊन तिची पूजा केली जाते . 
    पाचव्या माळेस सकाळी दुर्गा दौड चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मंदिरासोबत आजूबाजूचा परिसरातील महिला भगिनींनी रस्त्यावर मंदिरात रांगोळी काढल्या होत्या . तर येणाऱ्या दुर्गा दौड चे स्वागत आरती करून करण्यात येत होते त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते. 
    शुक्रवारी सहाव्या दिवशी रात्री साडे सात वाजता  महा आरतीचे नियोजन करण्यात आले असल्याने शहारातील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने आपल्या सोबत आरतीचे ताट घेऊन  उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे व सेवा समितीचे अध्यक्ष डॉ संगीता कलाल यांनी केले आहे 
    या सर्व उपक्रमात मंदिर सेवा समिती  डॉ संगीता कलाल, सचिव विद्या सोनवणे उपाध्यक्ष निलेश सोनार, कार्याध्यक्ष वकिल पाटील , खजिनदार स्वप्नील पाटील, सहसचिव सोनाली जयस्वाल, सदस्य डॉ विजय कलाल, गणेश सोनवणे, संजय प्रकाशकर, डॉ लक्ष्मण सोनार,  अजय सोनवणे, प्रा गणेश सोनवणे, निलेश देवरे, प्रा बी डी मराठे, प्रा विलास जावरे, गिरीश जावरे, भटू जव्हेरी, दीपिका शहा मेहनत घेत आहेत.
     येत्या कोजागिरी पौर्णिमेस मंदिराच्या वर्धापन दिन साजरा होणार असल्याने 28 तारखेस होमहवन होऊन भंडारा नियोजित आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समिती तर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

|