Header Ads Widget


संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदवावा – जि .प .अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित


नंदुरबार (प्रतिनिधी ) - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2023 -24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. अभियानाच्या माध्यमातून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवून गावे आदर्श करावीत असे आवाहन  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावित यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्यमान सुधारून त्यांचा  जीवनस्तर उंचवावा व ग्रामस्थान  स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी करून घ्यावे यासाठी सन 2000 -2001 पासून राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मार्च 2018 मध्ये पायाभूत सर्वेक्षनानुसार  नंदुरबार जिल्हा हगणदारी मुक्त झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्वच्छतेची शाश्वतता रहावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.शाश्वत स्वच्छतेसाठी वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय याबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामेही जिल्ह्यात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गावे स्वच्छतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन त्यांची शाश्वतता टिकून राहावी यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात  ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अभियानाची सुरुवात दरवर्षी 11 ऑक्टोंबर अभियानाची  सुरुवात होते. त्यानुसार  ग्रामपंचायतींनी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 ऑक्टोबर पर्यंत बैठका घेऊन समितीची स्थापना करावी करावी व स्वयं मूल्यांकन करून दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत  गटविकास अधिकारीकडे परिशिष्ट भरून सहभाग नोंदवावा.स्पर्धा जिल्हा परिषद गट स्तरावरही होणार आहेत. जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 60 हजार रुपये बक्षीस मिळते.
तसेच  जिल्हास्तरावर राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ स्पर्धेत प्रथम येणाऱ्या  ग्रामपंचायत 6 लक्ष, द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीना 4 लक्ष व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीस 3 लक्ष रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विभागस्तरासाठी  प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायातीना अनुक्रमे 12 लक्ष, 9 लक्ष व 7 लक्ष रुपयांचे पारितोषिक देण्यात येते.  राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायातीना अनुक्रमे 50 लक्ष, 35 लक्ष व 30 लक्ष रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन तसेच शौचालय व्यवस्थापन यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावर 50 हजार, विभाग स्तरावर 75 हजार व राज्यस्तरावर 3 लक्ष रुपयांचे बक्षीस विशेष पुरस्काराची बक्षिसे देण्यात येतात.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायातीनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उस्फूर्तपणे सहभाग नोंदविल्यास  गावे स्वच्छ व सुंदर राहतीलच.तसेच अभियानात शासनाकडून मिळणाऱ्या बक्षीस रकमेच्या योग्य व्यवस्थापन केल्यास गावात अनेक विकासात्मक व ग्रामस्थांच्या उपयोगी असे कामे करता येतील. यासाठी सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी समन्वय ठेवून गावात अभियान राबविण्याबाबत एकमत करावे. अभियानात  ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या  अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन  कुमार, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी. धस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयवंत उगले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|