नंदुरबार /प्रतिनिधी
तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून शासन धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवार 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय तळोदा कार्यालयातील सभागृहात सोडत करण्यात येणार असल्याचे अध्यख कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
तळोदा तालुक्यातील 6 सजामध्ये नळगव्हाण, करडे, सोमावल बु. कडेल, मोड, व बोरद तर अक्कलकुवा तालुक्यातील 7 सजामध्ये मोरंबा, ब्राम्हणगांव, रायसिंगपुर, काठी, सिंगपुर बु., मांडवा व डाब असे एकुण 13 राजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत. यासाठी शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या 80 टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच 80 टक्के रिक्त साजामधुन निश्चित झालेल्या साजांत शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही श्री. पत्की यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0 Comments