Header Ads Widget


मंत्री डॉक्टर, खासदार डॉक्टर, अध्यक्ष डॉक्टर तरी नंदूरबारमध्ये झाडाखाली महिलेची प्रसुती ! धक्कादायकबाब !




नंदुरबार/प्रतिनिधी


मंत्री डॉक्टर, खासदार डॉक्टर, अध्यक्ष डॉक्टर तरी नंदूरबारमध्ये  झाडाखाली महिलेची प्रसुती ! झाडाखाली आदिवासी महिलेची प्रसूती, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष, डिजीटल इंडियात आदिवासींची दुरावस्था, नंदूरबार जिल्हा शासकीय रुग्णालय जवळ डिसी टाऊनजवळ नंदूरबार जिल्ह्य़ातील एका आदिवासी महिलेची दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी प्रसुती झाली. बिरसा फायटर्सचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी व सामाजिक कार्यकर्त्या तथा आरोग्य सेविका मनिषा वळवी यांनी या महिलेला मदत केली, मनिषा वळवी यांनी प्रसुतीची प्राथमिक साहित्य झाडाखाली आणून या महिलेची सुखरूप प्रसुती केली, या महिलेने एका गोंडस व छानशा बाळाला जन्म दिला आहे, विशेष म्हणजे नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे स्वतः डॉक्टर आहेत, विजयकुमार गावीत हे नंदूरबार तालुक्याचे डॉक्टर आमदार आहेत, नंदूरबार जिल्ह्याच्या खासदार हिना गावित ह्यासुद्धा डॉक्टर आहेत, नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित ह्या सुद्धा डॉक्टर आहेत, नंदूरबार जिल्ह्य़ात मंत्री असो की आमदार, खासदार असो हे सगळेच डॉक्टर झालेले व्यक्ती आहेत, शासकीय महत्वाच्या व मोठ्या पदांवर डॉक्टर लोकप्रतिनिधी असतांना, नंदूरबार शहरात एका आदिवासी महिलेची आजही झाडाखाली प्रसुती होते याला दुर्दैवच म्हणावे लागेल,
भारताला डिजीटल इंडिया बनवण्याच्या  मोठ्या मोठ्या घोषणा आताचे लोक्रतिनिधी करीत आहेत, परंतु आदिवासी समाज आजही शिक्षण, आरोग्य या मुलभूत सुविधांपासून दुर्लक्षित आहे.

Post a Comment

0 Comments

|