Header Ads Widget


चोरीस गेलेल्या १५ मोटारसायकल व ६ मोबाईल हस्तगतदोघांना अटक ; नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कारवाई....


चोरीस गेलेल्या १५ मोटारसायकल व  ६ मोबाईल हस्तगत
नंदुरबार / प्रतिनिधी

नंदुरबार शहरातून चोरीस गेलेल्या १० लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या १५ मोटारसायकल तसेच ०६ मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यशंवतभाई पुन्याभाई चौधरी (रा.मु.मोरझिरा,ता.अहवा, जि.डांग,गुजरात) यांच्या मालकीची २५ हजार रुपये किंमतीची एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची सी.बी.शाईन मोटार सायकल (क्रमांक जीजे-३०-बी-६३०८) ही १८ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीच्या पुढे असलेल्या प्रकल्प कार्यालयाजवळ रोडवर लावलेली असतांना अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी मोटरसायकलीच्या शोधासाठी ३ पथके तयार केली. अधीक्षक श्री. पाटील यांना मोटारसायकलची चोरी करणारे दोन ईसम बसस्थानक परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने टापू परिसरात सापळा रचला.
संशयीत आरोपी हे एका मोटारसायकलसह येत असतांना दिसून आले. त्यांना ताब्यात घेतले. राहुल लक्ष्मण भिल, दिनेश अजित ऊर्फ इज्जत वसावे, दोन्ही रा. खामगाव ता.जि. नंदुरबार यांची विचारपूस केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडे २५ हजार रुपये किंमतीची एक होन्डा कंपनीची काळ्या रंगाची सी.बी. शाईन मोटार सायकल (जीजे-३०-बी-६३०८) मिळाली. याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर जप्त करण्यात आली. त्यांनी आणखीन १४ मोटारसायकली तसेच ६ मोबाईल चोरी केल्याची माहिती दिली.
सदरच्या मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या आहेत. यात ६० हजार रुपये किंमतीची एक हिरोहोन्डा कंपनीची स्पलेंडर प्लस काळ्या रंगाची मोटार सायकल, ८ हजार रुपये किमतीची एक एम.आय. कंम्पनीचा फिक्कट सोनेरी रंगाचा मोबाईल, ९ हजार रुपये किमतीचा रेड मी. कंम्पनीचा राखाडी व निळ्या रंगाचा मोबाईल, ७ हजार रुपये टेक्नो स्पार्क कंम्पनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन असा एकुण १० लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या एकुण १५ मोटारसायकली व ६ मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे. राहुल लक्ष्मण भिल याच्याविरुध्द यापुर्वी उपनगर पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे उपअधीक्षक, संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोसई विकास गुंजाळ, पोहेकॉ दिपक गोरे, पोहेकॉ जगदिश पवार, पोहेकॉ राजेश येलवे, पोना भटु धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल पगारे, पोना नरेंद्र चौधरी, पोशि किरण मोरे, पोशि राहुल पांढारकर, पोकॉ भालचंद्र जगताप, पोशि अनिल बडे, पोशि इम्रान खाटीक, पोशि कल्पेश रामटेके, पोशि युवराज राठोड, पोशि संदिप सदाराव पोशि विशाल मराठे, पोशि प्रविण वसावे यांच्या पथकाने केली.

७० हजार रुपये किंमतीची होन्डा कंम्पनीची लिओ काळ्या रंगाची मोटार सायकल, ४० हजार रुपये किंमतीची हिरो होन्डा कंम्पनीची स्प्लेन्डर मोटार सायकल, ४० हजार रुपये किंमतीची डिलक्स हिरो कंम्पनीची काळ्या रंगाची मोटार सायकल,
६० हजार रुपये किंमतीची डिलक्स हिरो कंम्पनीची काळ्या रंगाची मोटार सायकल, ६५ हजार रुपये किंमतीची एक हिरोहोन्डा कंपनीची स्पलेंडर प्लस सिल्वर रंगाची मोटार सायकल, ६० हजार रुपे किमतीची होन्डा कंम्पनीची शाईन ग्रे रंगाची गोल्डन, ३५ हजार रुपये किंमतीची हिरो होन्डा कंम्पनीची मोटरसायकल, ४० हजार रु. किंमतीची डिसकव्हर मोटार सायकल,६० हजार रुपये किंमतीची हिरो होन्डा कंम्पनीची स्प्लेन्डर प्लस काळ्या रंगाची मोटार सायकल, ५५ हजार रुपये किंमतीची हिरो होन्डा कंम्पनीची स्प्लेन्डर प्लस काळ्या रंगाची मोटार सायकल, १ लाख ५० हजार किमतीची रॉयल इनफिल्ड कंम्पनीची काळ्या रंगाची बुलेट, १ लाख ६० हजार रुपयांची रॉयल इनफिल्ड कंम्पनीची लाल काळ्या रंगाची बुलेट,
६० हजाराची हिरो होन्डा कंम्पनीची स्प्लेन्डंर काळ्या रंगाची मोटार सायकल असा मुद्देमाल मिळून आला आहे. तसेच १० हजाराचा विवो कंम्पनीचा फिक्कट निळ्या रंगाचा मोबाईल, १० हजाराचा जिओ कंम्पनीचा निळ्या रंगाचा मोबाईल, १० हजाराचा आयटेल A ४९ कंम्पनीचा फिक्कट आकाशी रंगाचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, May 21. | 7:09:9 AM