येथील वसंतराव नाईक उच्च माध्य विद्यालयातील रा से यो एकका मार्फत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला . प्रकाशा तापी नदी परिसरातील घाट साफ सफाई मोहीम राबविण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की अधिक मास हा हिंदू धर्मीय लोकांसाठी पवित्र महिना मानला जातो. या अधिक मासात हिंदू धर्मीय बंधू भगिनी हे पवित्र स्नानासाठी परिसरातील दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या प्रकाशा येथील तापी नदीवरील घाटावर जमतात . त्याच प्रमाणे खान्देशात दशामाता उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो . मातेचा मूर्तीचे विसर्जन देखील तापी नदीचा पात्रात करतात . पण काही भाविक वर्ग हे आपली जुनी वस्त्र, पूजेचा सामान,व खंडित मूर्ती, घरातील देवाचे फोटो इत्यादी साहित्य तापी नदीचा काठावरच सोडून देतात व त्यामुळे तापी काठावर सर्वत्र मुर्त्या , वस्त्र, पूजेचा सामान, निर्माल्य हे सर्वत्र पसरलेली दिसतात .
हिंदू धर्मीय लोक अगदी श्रध्देने मूर्ती पूजा करतात ,अधिक मास निमित्त नदीवर स्नान करतात. मूर्ती, फोटो यांची विटंबना होऊ नये यासाठी वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील रा से यो एककामार्फत साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यासोबत रा से यो अधिकारी प्रा एस जे वळवी , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा नंदलाल निझरे, प्रा आर एन सूर्यवंशी, प्रा जी एन सोनवणे यांनी तापी काठावरील मूर्त्या, कचरा, फोटो, वस्त्र संकलित करून फोटो व मुर्त्या तापी नदीचा पात्रात विसर्जित केल्या . तर वस्त्र , निर्माल्य , कचरा, लगतच असलेल्या मोकळ्या जागेतील खड्ड्यात विसर्जित केले . जवळपास 1230 किलो कचरा व वस्त्र होते. मूर्ती फोटो, व पूजेची साहित्य विसर्जन ही मोठया प्रमाणात करण्यात आल्या. रा से यो च्या या कार्याचे सचिव प्रा संजय जाधव, सौ वर्षा जाधव यांनी कौतुक केले तर समन्वयक संजय राजपुत व प्राचार्य एम बी मोरे यांनी प्रोत्साहन दिले .
वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील रा से यो एककातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक प्रकाशा तापिकाठावर उपस्थित असलेले शिंदखेडा येथील भाविक भैया चौधरी, नाशिक येथील भाविक तसेच उपस्थित परिसरातील नागरिकांनी केले .
उपस्थित नागरिकांना देखील रा से यो मार्फत तापी नदीचा परिसर स्वछ ठेवण्या संदर्भात मार्गदर्शन करून आव्हान करण्यात आले. श्रावण महिना येत असल्याने पुन्हा नव्याने एक किंवा दोन वेळा हा उपक्रम राबविण्यात येईल असे आयोजकामार्फत सांगण्यात आले .
0 Comments