Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज नागरिकांना खरेदी करता येणार..


नंदुरबार/ प्रतिनिधी 

  नंदुरबार जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असून तो नागरिकांना खरेदी करता येणार असल्याचे धुळ्याच्या डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी प्रसिद्धी  पत्रकान्वये कळविले आहे.

ज्या नागरिकांना तिरंगा ध्वज हवा असेल त्यांना आपल्या नजिकच्या टपाल कार्यालयातून घेता येणार आहे. तसेच ज्या संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना जास्त संख्येने तिरंगा ध्वज हवे असल्यास त्यांनी आपली मागणी नजिकच्या टपाल कार्यालयात नोंदवावी जेणेकरुन तिरंगा ध्वज सहज मिळू शकतील, या  सेवेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन  प्रवर अधिक्षक, डाकघर, धुळे विभाग धुळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


Post a Comment

0 Comments

|