मुंबई/प्रतिनिधी
वनहक्क जमिनीवर भू-माफिया अतिक्रमण करून सपाटीकरण करत असल्याच्या तक्रारी विविध जिल्ह्यांमधून येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील मुरखळा शहराजवळील भागात शासनाने वाटप केलेल्या वनहक्क जमिनीवर भू-माफियांनी कब्जा केल्याबाबतचा प्रश्न सदस्य रोहित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, डॉ. देवराव होळी, यशोमती ठाकूर, संजय केळकर यांनी उपस्थित केला होता.
महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी, गडचिरोली करीत आहेत. परंतु, ज्या जिल्हात वन हक्क जमिनीबाबत अनियमितता झाली आहे किंवा भूमाफियांकडून वनहक्काचा गैरवापर केला जात आहे, अशा तक्रारी ज्या जिल्ह्यातून येत आहेत, तेथे त्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांना देण्यात येतील. तसेच वन मंत्री यांच्या उपस्थित यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
0 Comments