साक्री प्रतिनिधी/अकिल शहा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती असलेल्या साक्री शहराजवळ कावठे फाट्या जवळ ताज हॉटेल च्या शेजारी आज दिनांक 3 जून रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास गुजरात कडून साक्री मार्गे पाचोरा कडे जाणाऱ्या दोन खाजगी बसेस मध्ये अपघात होवून अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 3 जून रोजी पहाटेच्या सुमारास गुजरात वरून साक्री मार्गे धुळ्याच्या दिशेने जाणारी खाजगी बस (श्रीहरी) क्रं.GJ-26-T 5143 या वाहनाच्या वाहन चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी खाजगी बस( साई रथ) क्रं.GJ-05-BV-4225 मागून धडकल्याने अपघात झाला, या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे, या अपघातात धुळे तालुक्यातील नंदाळेच्या रहिवासी प्रमिलाबाई धर्मा पाटील या वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे व तसेच काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालय धुळे येथे भरती करण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:- संगीता सुभाष पाटील(40, तांबोळ), सुनंदाबाई आधार पाटील(45, नंदाळे), मुकेश शालिक पाटील(30,पळहाण), विठ्ठल राठोड (38,जामनेर), बबलू चौधरी (35,एरंडोल) आदि जखमी झाले आहेत.
श्रीहरी लक्झरी च्या चालकाने रस्त्यामध्ये अचानक ब्रेक मारल्याने अपघात झाला व त्या ठिकाणाहून त्याने पळ काढला तर साईरथ लक्झरीचा चालक ही अपघातात जायबंदी झाला आहे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे.
0 Comments